Shambhuraje Desai, Satyajitsinh Patankar
Shambhuraje Desai, Satyajitsinh Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सत्यजितसिंहांना माझ्या मंत्री पदाची भिती का वाटते...

अरूण गुरव

मोरगिरी : सातारा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्री पदाची भीती का वाटते मला माहित नाही. मात्र, मला मंत्री पद मेहरबानी वर मिळाल्याची भाषा करणारे सत्यजितसिंह आपल्यावर तर अनेक वर्षांपासून ज्या पक्षाची मेहेरबानी आहे. मग त्या मेहेरबानीवर आपण आमदार का बनू शकला नाही. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत आपल्याला घरी बसवले. सात वर्षापूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान ठेवा, असे प्रतिउत्तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना दिले आहे.

दौलतनगर (ता.पाटण) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे संचालकपद घेऊन ही केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता घराणेशाहीने पुन्हा त्याच पदावर मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे. त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही. मंत्री पद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही. ते मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम, कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते. याची माहिती आपण आपल्या वडिलांकडून घेतली असती तर अधिक बरे झाले असते.

राज्यातील आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांचे सरकार आहे. हे केवळ एका पक्षाचे सरकार नाही. याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत. कुणाच्या मेहरबानीवर कुणाला मंत्रीपदे मिळाली असली बेताल वक्तव्ये करावीत. जिल्हा बँकेची केवळ १०२ मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. केवळ 14 मते घेऊन विजयाने हुरळून गेलेल्या सत्यजितसिंह यांना माझ्या मंत्री पदाचा राजीनामा मागण्या एवढी आपली राजकीय उंची तरी आहे का.

आपण पाच वर्षातून केवळ निवडणुकीपूरतेच वाडयातून बाहेर पडता हे ही जनतेलाही माहित आहे. त्यामुळे आपणाला वाड्याबाहेरील संबंध कसे जपतात याची कल्पना काय असणार त्यामुळे इतरांच्या बरोबर असलेली आपुलकी, जिव्हाळ्याचे संबंध आणि घरोबा यातला फरक आपणाला काय कळणार, असा खोचक टोला ही त्यांनी सत्यजितसिंह यांना लगावला. तसेच दोन हात करण्याची भाषा आम्हाला करू नये, आम्हीही यापुढे जशास तसे उत्तर द्यायला नेहमीच तयार आहे, असा इशाराही मंत्री देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT