Tushar Doshi-Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Update : सातारा एसपींना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे शंभूराज देसाईंनी सांगितले कारण; म्हणाले, ‘कदाचित चौकशीत बाधा...’

Shambhuraj Desai Statement : सातारा झेडपी वादानंतर एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Vijaykumar Dudhale

Satara, 30 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राड्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. कदाचित चौकशीत बाधा येऊ नये; म्हणून अधीक्षक दोशी यांना रजेवर पाठविण्यात आले असावे, असे कारण पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राड्याप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांना आजपासून चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. हे मलाही तुमच्याप्रमाणे आमच्या सूत्रांनीच सांगितले आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) म्हणाले,मी माझ्या कार्यालयातील लोकांना याबाबतची वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती घेतो. पण, दोशी यांना सक्तेच्या रजेवर पाठविल्याचे माध्यमांतून आलेले आहे. ते सध्या सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नाहीत, त्यांना मुख्यालय सोडून जायला परवानागी दिलेली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

गृहविभाग, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून याबाबतची अधिक माहिती घेण्यात येईल आणि आवश्यकता असेल तर माध्यमांना माहिती देण्यात येईल. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचा निर्णय विधानमंडळात झाला आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या सभापतींचं काय मत आहे, तो निर्णय राखून ठेवला आहे, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, सातारा प्रकरणी सभागृहात पुन्हा चर्चा झाली. सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर सभापतींच्या दालनात वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात सभापतींनी निर्णय दिला की, विधान परिषदेत उपसभापतींनी निलंबनाचा निर्णय दिला आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, यासाठी हे प्रकरण घटना तज्ज्ञांकडे पाठविण्यात येईल. त्यांचं मत आल्यानंतर आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उपसभापतींचे निर्णय पारित झाले आहेत. मात्र, सभापतींचा निर्णय हा घटनातज्ज्ञांच्या अभिप्रायासाठी पाठविल्यामुळे प्रलंबित आहे. हे सर्व विधिमंडळाच्या अखत्यारित आहे. जेव्हा कायदेतज्ज्ञांच्या अभिप्राय येतील, तेव्हा सभापती निर्णय घेतील, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा राडा प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे फडणवीस यांनी कदाचित चौकशीचे आदेश दिले असतील. वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते, तेव्हा त्यांना त्या पदावर ठेवत नाहीत. कारण ते पदावर राहिले, तर चौकशीत बाधा येऊ शकते. म्हणून कदाचित चौकशी सुरू करण्यात आली असल्यामुळे त्यांना रजेवर जायला सांगितले असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT