Eknath shinde, Shambhuraj Desai
Eknath shinde, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai यांचे स्वप्न साकार : साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून झेंडा फडकवणार

Umesh Bambare-Patil

सातारा : शिंदे, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली आहे. आज त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदासह साताऱ्याचे पालकमंत्रीपद ही मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामविकास किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंना बंडासाठी प्रवृत्त करण्यात शंभूराज देसाई यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीतच स्थान फिक्स झाले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला.

यामध्ये एकुण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे नऊ आणि एकनाथ शिंदे गटाचे नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. या यादीत पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी १७ व्या क्रमांकावर मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. ग्रामविकास किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

तसेच साताऱ्याचे पालकमंत्रीपदही त्यांनाच मिळणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्री पद दिले होते. तसेच त्यांच्याकडे वाशिमचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. त्या काळात त्यांनी चांगले काम केले होते. आता एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना बढती मिळाली असून त्यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळले आहे. तसेच त्यांच्याकडे साताऱ्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT