Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर खंडपीठाच्या प्रश्नात शंभूराज देसाई लक्ष घालणार...

अरूण गुरव

मोरगिरी : कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सहा जिल्ह्यांतील लोकांचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. कोल्हापूर येथे सर्किट बेंच सर्वसामान्य जनता, पक्षकार करिता स्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तातडीने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

दौलतनगर येथे आज खंडपीठ कृती समितीने भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण, सचिव अ‍ॅड. विजयकुमार ताटे- देशमुख, सहकार बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, अ‍ॅड. बाबूराव नांगरे, अ‍ॅड. डी. पी. जाधव उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘सहा जिल्ह्यांचा सर्किट बेंच प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, तरी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होईपर्यंत मी स्वतः लक्ष देऊन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तातडीने सर्किट बेंच हा प्रश्न मार्गीलावणार आहे.’’

खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके म्हणाले, ‘‘सर्किट बेंच लढा अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री व मुख्य न्यायमूर्ती यांची या विषयी लवकर भेट होणे आवश्यक असून, त्यांना भेटण्यासाठी आपण पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT