Satara Politics : रामोशवाडीच नाही तर आज इथला सगळाच भाग गेल्या ७५ वर्षांपासून टँकरने पाणी पितोय.२५ वर्षे इथे त्यांची एकहाती सत्ता होती. दहा वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलंय. त्यावेळी त्यांचे हात कोणी बांधले नव्हते. तुम्ही जलसंपदा मंत्री होते, आज तेथे टँकर चालू आहे म्हणायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुमचे अपयश जनतेच्या माथी का मारताय. अशा शब्दांत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंवर (Sashikant Shinde) निशाणा साधला आहे.
सातारा (Satara Politics) पोलीस प्रशासन आणि जिहे कटापूर योजनेतील अधिकाऱ्यांनी काल रात्री रामोशीवाडी तलावात पाणी जाणाऱ्या आउटलेट वॉल बंद करण्याचा प्रयत्न केला.पण तो गावकऱ्यांनी हाणून पाडला.या रामोशीवाडीतील गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी महेश शिंदे पाण्याचा वॉल बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला होता. तसेच यासोबतच रामोशीवाडीच्या ग्रामस्थांसोबत जिहे कटापुर पाणी योजनेच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावरुन महेश शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
२१० कोटी रुपयांचं टेडर आम्ही खारोटे अँड कंपनीला दिलेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर चार दिवसात हाती येईल, या माध्यमातून आम्ही या भागांना पाणी देत आहोत.मला जर असलं चुकीचं राजकारण करयाचं असत तर मी या गोष्टी केल्या नसत्या.जे सत्य आहे ते सांगतो. त्यांचं राजकारण हे त्यांच्या कुटूंबियांच्या अर्थकारणासाठी होतं. आज मी त्यांचं ते अर्थकारण थांबलं म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. पण जनतेसाठी हितासाठी जे करायला लागेल ते करतोय. मी जरंडेश्वर साठी लढतोय हे जर त्यांना सुडाचं राजकारण वाटत असेल तर ठिक आहे.
25 वर्षे सत्ता आणि जलसंपदा विभागाचे मंत्री असून सुद्धा ते या भागाचे पाणी प्रश्न, शेतक-यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. मी आमदार होताच संपूर्ण खटाव तालुक्यातील दुष्काळ संपवलाय आणि रामोशीवाडीचा दुष्काळही मीच संपवणार. असा विश्वासही महेश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.