Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार व रोहित पवारांनी अहिल्यादेवी होळकरांची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न केला - राम शिंदे

माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली.

अमित आवारी

अहमदनगर - चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व आमदार गोपीचंद पडळकर यांनी निमंत्रित करण्यात आले नाही. गोपीचंद पडळकर यांनी चौंडीत रॅली आणली. ही रॅली चौंडीत दाखल होताच रॅलीचे रुपांतर सभेत झाले. या सभेत राम शिंदे व माजी मंत्री सदाभाऊ खोतही सहभागी झाले. या प्रसंगी राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली. ( Sharad Pawar and Rohit Pawar tried to hijack Ahilya Devi Holkar's birthday - Ram Shinde )

राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297व्या जयंती निमित्ताने मी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. मी तुमची मनापासून माफी मागतो. कारण मे महिन्याच्या उन्हात अहिल्यादेवींच्या जन्मदिनी रस्त्यावर बसावे लागले. मला तुमची व्यवस्था करता आली नाही. या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. वास्तविक पाहता ही जयंती मागील अनेक वर्षे या चौंडीमध्ये होते आहे. वास्तविक पाहता शासन, प्रशासन व पोलिस प्रशासन याला कारणीभूत आहेत.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतची जयंती सर्व समावेशक झाली. सर्वलोकांचा मानसन्मान आम्हाला ठेवता आला. या जयंतीच्या दिवशी अहिल्याभक्त, महाराष्ट्रातील समाज बांधव हे आपले शक्तिपीठ आहे. प्रेरणापीठ आहे. त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आपण येथे येतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व त्यांचा नातू रोहित पवार यांनी ही जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व एकत्र जमले आहेत.

शरद पवार व रोहित पवार यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आम्ही सुसंस्कृत आहोत, संयमी आहोत, अहिल्यादेवींचे अनुयायी आहोत, तुम्ही आमची परीक्षा पाहू नका. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना अडविण्यात आले तरी अहिल्याभक्तांनी संयम ढळू दिला नाही. हे फक्त येथे जयंतीच करायला आलेले नाहीत तर चौंडीतील ग्रामपंचायतची 80 एकर जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री होते. तुमच्या घरातील व्यक्ती चार वेळा उपमुख्यमंत्री आहेत. कधी चौंडीला जयंती केल्याचे ऐकीवात नाही, पाहण्यात नाही. आता का आले, अशासाठी आले. कारण नातवाची काळजी आहे, असा आरोप राम शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केला.

त्यांनी जयंतीसाठी कुणाला सांगितले नाही, कुणाला विश्वासात घेतले नाही. पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासन ताब्यात ठेवलं. त्याने प्रश्न सुटणार नाही. मी जलसंधारण मंत्री होतो. एवढे सोपे नाही. यांच्या बगलबच्च्यांनी नदीतील वाळू अवैधरित्या उपसली आहे. त्याची कुठे चौकशी झाली नाही. याचा चौकशी झाली पाहिजे. नदीला पूर आला तर चौंडीला विळखा देतो हा इतिहास आहे. पुराने टक्कर मारली व मंदिर पडले तर याला जबाबदार कोण आहे. याची चौकशी झाली पाहिजे. माझ्या घरी पोलिस अधिकारी एक तास बसून होते. पडळकर येत आहेत काय करायचे विचारले त्यांना सांगितले, आधी जे केले तेच करा. माझ्याकडे येऊच नका. मीही जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळी सर्वांना विश्वासात घेतले. ज्या अण्णासाहेब डांगे यांनी चौंडीत काम केले त्यांनाही विश्वासात घेतले नाही, असा आरोपही राम शिंदे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT