Sharad Pawar-ShivendraSinh Raje Bhosale-AbhaySinh Raje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendra Raje :'अभयसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत आले नसते, तर काँग्रेसकडून ते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ठरले असते’

Satara NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला, असे मी म्हणणार नाही. मी नंतर निवडून आलो, मी नवीन होतो, हे ठीक आहे. पण, अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते.

Vijaykumar Dudhale

Satara, 24 December : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला, असे मी म्हणणार नाही. पण, अभयसिंहराजे भोसले यांच्यावर नक्कीच केला आहे. कारण, अभयसिंहराजे भोसले जर १९९९ मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते, तर काँग्रेसने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले असते. पण राष्ट्रवादीत त्यांना बाजूला ठेवण्यात आले, अशा शब्दांत प्रथमच कॅबिनेट मंत्री बनलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कराड येथील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendraSinh Raje Bhosale) यांनी राष्ट्रवादीकडून अभयसिंहराजे भोसले यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला, असे मी म्हणणार नाही. मी नंतर निवडून आलो, मी नवीन होतो, हे ठीक आहे. पण, अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. मीही त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता.

अभयसिंहराजे भोसले जर 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आले नसते, तर काँग्रेसने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले असते. त्या वेळी काँग्रेसमध्ये अभयसिंहराजे आणि विलासराव देशमुख हे दोघेच ज्येष्ठ नेते होते. त्यातही अभयसिंहराजे हे विलासराव देशमुखांना एक टर्म सिनियर होते. अभयसिंहराजेंवर कुठलेही आरोप नव्हते, संयमी नेतृत्व होतं, असेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना का बाजूला ठेवलं? काय राजकारण झालं? हा विषय वेगळा आहे. तो आपण सोडून देऊ आता. अभयसिंहराजेही आता हयात नाहीत. पण, एकच सांगतो की जसं अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं. तसं त्यांना पद दिलं नाही म्हणून सातारा जिल्ह्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सातारा जिल्ह्याचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

अभयसिंहराजे भोसले यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे नेतृत्व दिलं असतं, तर जिल्ह्यातील अनेक प्रश्न सुटले असते. अभयसिंहराजे भोसले यांनीच उरमोडी धरणाचे काम केले आहे. ते होते म्हणून ते नऊ टीएमसीचे धरण होऊ शकले आहे. त्या उरमोडी धरणातून आज सातारा, माण, खटाव यांना पाणी मिळतं. म्हणून जे नुकसान झाले आहे, ते संपूर्ण सातारा जिल्ह्याचे झालेले आहे, असा दावाही भोसले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT