Sharad Pawar | Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar VIDEO : 'शिवरायांनी सूरत लुटली नव्हती,' फडणवीसांच्या विधानावरून शरद पवारांनी खडसावलं...

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून फडणवीस यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

Akshay Sabale

Maharashtra Politics: मालवणधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यातच उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरत लुटली नव्हती, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर राजकीय स्तरातून त्यांच्यावर टीकास्र होत आहे. फडणवीसांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी भाष्य केलं आहे.

"खोटा इतिहास जनतेसमोर आणि नव्या पिढीसमोर मांडू नये. चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्यास समाजात गैरसमज होतात," अशा शब्दांत पवारसाहेबांनी (Sharad Pawar) फडणवीस यांना फटकारलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, "ज्यांचं आयुष्य इतिहास लिहण्यात, संशोधन करण्यात गेले, त्यांना याबाबत वास्तव मांडण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. याबद्दल जयसिंहराव पवार यांनी सांगितलं की, 'एकदा नव्हे, तर दोन वेळा शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती. मात्र, स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता.' इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही जयसिंहराव पवार यांच्या मताला दुजोर दिला आहे."

"त्यामुळे खोटा इतिहास जनतेसमोर आणि नव्या पिढीसमोर मांडू नये. चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्यास समाजात गैरसमज होतात," असं म्हणत पवारसाहेबांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) सुनावलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

मुंबईतील महाविकास आघाडीच्या 'जोडो मारो' आंदोलनावेळी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया' करण्याची वेळ आली आहे, असा घणाघात केला होता. याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल उपस्थित केला होता.

"काँग्रेसनं इतिहासात काय शिकवलं, तर शिवाजी महाराज यांनी सूरत लुटली. सूरत लुटली नव्हती, स्वराज्याचा खजिना त्या लोकांवर आक्रमण करून परत मिळवला होता. महाराज जणू काही सामान्य माणसाची लूट करायला गेले होते, असा चुकीचा इतिहास शिकवणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरे तुम्ही माफी मागायला सांगणार आहात का? की, खुर्चीसाठी मिंधेपण स्वीकारणार आहात? याचं महाराष्ट्राला उत्तर द्यावं," असं आव्हान फडणवीस यांनी दिलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT