Sharad Pawar, Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांनी बंडखोरांवर तोफ डागली; म्हणाले, ताकद दिल्यानंतरही ही मंडळी भाजपच्या पंगतीत जाऊन बसली

NCP Sharadchandra Pawar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफांवरटीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, आज काही लोक वेगळ्या रस्त्यावर गेले आहेत. आम्ही महाराष्ट्रात नवनवीन लोकांना संधी दिल्या.

Sachin Waghmare

Sharad Pawar News : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. उद्धव ठाकरेंप्रमाणेच हा शरद पवारांसाठीही हा मोठा धक्काच होता. महाराष्ट्रातले हे दोन बलाढ्य पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर पवार आणि ठाकरेंसह महाराष्ट्राच्या राजकारणाचीही दिशाही स्पष्ट होणार आहे.

त्यामुळे या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ठाकरे आणि पवारांनीही बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यातच शरद पवारांनी (Sharad Pawar) साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकेची तोफ डागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, आज काही लोक वेगळ्या रस्त्यावर गेले आहेत. आम्ही महाराष्ट्रात नवनवीन लोकांना संधी दिल्या. मुश्रीफ यांचे नाव जेव्हा समोर आले. त्यावेळेला काम करण्याची शक्ती मिळू दे. या दृष्टीने आम्ही विचार केला,असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्राला गरज असताना तशी खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. अशावेळेला आमची साथ देण्याऐवजी काही लोक निघून गेले, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर केला.

पवार म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी आम्हाला सांगितले, आम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहोत. तुम्ही आमच्याबरोबर चला. त्यावेळी ते योग्य नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी आम्ही असे केले नाही तर आम्हाला आत जावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर लगेच त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यांच्या घरातील एका भगिनीने आम्हाला त्रास देणार असाल तर गोळ्या घाला, अशी भूमिका घेतली होती, असेही पवार यांनी सांगितले.

एका पत्रकाराने परवा छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला, तुम्ही भाजप सोबत का गेला? त्यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलो नसतो तर आणखी तुरुंगात जावे लागले असतं असं स्वतःच छगन भुजबळ यांनी सांगितले. ज्याचे हात अस्वच्छ आहेत, बरबटलेले असतात. त्यांना चिंता लागते माझ्यासारख्या व्यक्तीला चिंता लागत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मला ईडीची नोटीस आली होती. राज्य बॅंकेसंदर्भात मला नोटीस देण्यात आली, असे सांगण्यात आले. नेमका कसला घोटाळा. मी लगेच ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी हात जोडतो पण येऊ नका, असे सांगितले. मग कागलला नेमक काय घडले ? यांना सगळे दिले. शक्ती दिली ताकद दिली. तरीदेखील ते भाजपच्या पंगतीत जाऊन बसले. बसताना त्यांनी जनतेशी बांधिलकी ठेवण्याची शब्द पाळला नाही, असा आरोप यावेळी पवारांनी केला.

जिथे हात बरबटलेला असतो, त्या लोकांना झोप येत नाही. आता त्या लोकांना विचारलं कसं वाटतंय? तर ते म्हणाले, आता आम्हाला झोप लागते. जे-जे लोकं आम्हाला सोडून गेले, त्यांच्या ईडीची कारवाईची फाईल कपाटात ठेवण्यात आली आहे. ती कारवाई त्यांनी रद्द केली नाही. आज ना उद्या याची चौकशी होणारच, त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवावा लागेल, अशा लोकांना धडा शिकवायचा असेल तर त्यांचा हिशोब करावा लागेल, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT