Sharad Pawar In Madha :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar In Madha : शरद पवारांकडून माढ्यात रणजित शिंदे 'बेदखल'; करेक्ट कार्यक्रम होणार ?

Maharashtra Assembly Election 2024 : पवारांनी शिंदे यांच्याकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही...

Harshal Bagal

Madha News : माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे माढा येथे शरद पवार यांची भेट घ्यायला गेले होते. या वेळी शरद पवारांनी शिंदे यांची भेट नाकारल्याचे वृत्त समोर आले आहे. बंद खोलीमध्ये शिंदे हे शरद पवारांना भेटायला गेले खरे, परंतु पवारांनी शिंदे यांच्याकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही. चर्चेला वेळदेखील दिला नाही. कठीण काळात आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिल्याने त्याचा राग पवारांच्या मनात असल्याचे उघडपणे दिसत आहे. (Latest Marathi News)

कापसेवाडी येथे झालेल्या शरद पवारांच्या कृषिनिष्ठ मित्र परिवाराच्या मेळाव्यामध्ये शरद पवार हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. पवारांनी माढा शहरांमध्येदेखील रणजित शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याचबरोबर मेळाव्याच्या ठिकाणी सभेमध्ये विचारपीठावरती रणजित शिंदे यांना चौथ्या रांगेत बसवले गेले. पवारांनी रणजित शिंदे यांच्याकडे पाहिलेदेखील नाही.

याउलट शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर ज्या-ज्या कारखानदारांनी कर्ज काढले आहेत, त्यांची यादी माझ्याकडे आणून द्या, मी त्याच्यावरती अभ्यास करून यांचा बंदोबस्त करतो, असा इशारादेखील पवारांनी भर सभेतच दिल्यामुळे शिंदे यांची नाचक्की पाहायला मिळाली. यावरूनच शरद पवारांच्या मनात माढा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी साथ सोडल्याचा किती राग आहे, हे स्पष्ट जाणवत आहे.

रणजित शिंदे यांनी मानेगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहे, परंतु आता सध्याचे तपलेले राजकारण पाहता रणजित शिंदे यांचा पुन्हा एकदा जनाधार मिळणे कठीण दिसत आहे. एका बाजूला मंत्री तानाजी सावंत, माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे, नितीन कापसे, सेनेचे संजय कोकाटे, शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर, असे अनेक विरोधक रणजित शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात येत आहेत.

त्यामुळे स्थानिक विरोधक आणि थेट शरद पवारांचा इशारा यामुळे रणजित शिंदे यांचा विधानसभा सदस्य होण्याचा मार्ग खडतर झाला आहे. असं म्हणतात की शरद पवारांच्या काठीचा आवाज येत नाही, परंतु शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शरद पवारांचा रोख माढा विधानसभेवर हा पुन्हा एकदा दिसून येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT