Sharad Pawar ON saamana editorial News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Reaction on Saamana: 'सामना' तील टीकेवर शरद पवार म्हणाले, "त्यांची भूमिका ऐक्याला पोषक.."

Sharad Pawar On Saamana Editorial: 'सामना'चे संपादक आणि आम्ही एकत्र काम करतो...

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar On Saamana Editorial : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून आज (सोमवार) भाष्य करण्यात आलं आहे. 'राजकीय वारसदार निर्माण करण्यात शरद पवार हे अपयशी ठरल्याची टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. यावर पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, "सामनाचा अग्रलेख मी वाचला नाही. वाचल्यानंतर मी माझे मत व्यक्त करेन. कारण 'सामना'चे संपादक आणि आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे एकत्र काम करत असताना पूर्ण माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं योग्य आहे. अन्यथा उगीच गैरसमज होतात. पण मला खात्री आहे की, त्यांची भूमिका ऐक्याला पोषक असेल,"

"मी अध्यक्षपद सोडलं म्हणजे संघटनेचं काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क न करण्याचं ठरवलं नव्हतं. परंतु अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात आले. मात्र, हे सर्व गैरसमज दूर झाले आहेत. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे, पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर मला राजीनामा मागे घ्यावा लागला," असे शरद पवारांनी सांगितले. (Political Web Stories)

ते म्हणाले, "सोलापुर गाव आणि शहर कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं आहे. सोलापुरात आम्हाला पहिलं काम करावं लागेल. सगळ्यांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होणार आहे. कारण लोकांमध्ये सहभाग घेण्याशिवाय अपेक्षा करणं योग्य नाही,"

मी दोन ठिकाणं निवडतो..

"मी पुन्हा नव्यानं कामाला सुरूवात केली आहे. कामाला सुरूवात करण्यासाठी मी दोन ठिकाणं निवडतो. एक म्हणजे कोल्हापूर आणि दुसरं म्हणजे सोलापूर. सोलापुरपासून आपण दौऱ्याला सुरूवात करावी, असा माझा विचार होता. त्यामुळे मी आज याठिकाणी आलो,"असे पवारांनी स्पष्ट केलं.

"पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच," असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. (Political Short Videos)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT