Prashant Virkar with Sharad pawar and Supriya Sule sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News : शरद पवारांनी चाखली माणदेशी केशर आंब्याची चव...!

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Maan News : माणदेशाच्या या फळांना बाहेर चांगली मागणी असून आंबा,डाळींब या फळांना विदेशातही चांगली मागणी आहे. माणदेशातल्या बिजवडी येथील प्रशांत विरकर व सौ. मोनाली विरकर या दाम्पत्याने आपल्या शेतात सेंद्रीय केशर आंब्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. आपले दैवत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना केशर आंबे भेट दिले. यावेळी या माणदेशाची सेंद्रीय केशर आंब्याची चव चाखत दोघांनीही प्रशांत विरकर यांचे कौतुक केले.

बिजवडी (ता.माण) येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेस NCP माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे Maan-Khatav अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी आपले वडील कै.सोनबाशेठ विरकर यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत झिरो बजेट शेती करत आहेत. दुष्काळात त्यांनी 600 झाडांची लागवड केली होती. यापैकी तीनशे रोपे पाण्याविना जळून गेली. तर उर्वरित तीनशे झाडांची चांगली बाग आली आहे.

कोणतेही रासायनिक खते,औषधे फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने ते आंब्याचे उत्पादन घेत आहेत. आंबा पूर्णपणे पाड लागल्याशिवाय उतरवत नाहीत. आंबा उतरवल्यानंतर एका खोलीमध्ये अडीच्या पद्धतीने पिकवून त्याची विक्री ते स्वतः शेतकरी ते थेट ग्राहक अशा पद्धतीने करत आहेत.

मुंबई,पुण्यातील काही नामांकित सोसायट्यांमध्ये व्हाट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मार्केटिंग करून याची विक्री करत चांगले उत्पन्न मिळवतात. प्रशांत विरकर हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.

त्यांच्या शेतातील हे सेंद्रीय केशर आंब्याची भेट त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व सुप्रिया सुळे यांना दिली. या माणदेशाची सेंद्रीय केशर आंब्याची चव चाखत दोघांनीही प्रशांत विरकर यांचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT