Dnyandev Ranjane, shivendra raje bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिंदेंचा पराभव करणाऱ्या रांजणेंनी शिवेंद्रराजेंना केला विजय अर्पण; राजकीय चर्चांना उधाण

अटीतटीच्या निवडणुकीत आमदार शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : सातारा जिल्हा बँक संचालकपदाच्या (Satara District Bank) निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये एक धक्कादायक निकाल हाती आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा पराभव झाला आहे. जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा एक मताने विजय झाला. आमदार शशिकांत शिंदे यांना पराभव चा धकाका बसला आहे, या निकालाने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, अनेक घडामोडी यामुळे घडणार आहेत, या निवडणुकित 49 मतदानापैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली तर विजयी उमेदवार रांजणे याना 25 मते मिळाली, जावलीतील एक जागेसाठी 100 टक्के मतदान झाले होते. सर्वच्या सरर्व 49 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

या विजयानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी राजणे म्हणाले, हा विजय जावळीमध्ये ज्यांनी एक वेगळी परंपरा सुरु केली होती, त्या पंरपरेला कटाळलेल्या मतदारांचा हा विजय आहे. सर्वसामान्य जावळीकरांची इच्छा आणि मतदारांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली. निवडणूक लढवत असताना अतिशय शेवटच्या टप्यामध्ये मला राष्ट्रवादीच्या वरिष्ट नेत्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. माझी इच्छा असून सुद्धा मला मतदारांच्या इच्छेमुळे माघार घेता आली नाही. माझा विजय मी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मतदारांना अर्पण करतो, असे रांजणे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलने मुसंडी मारली असली तरी सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जावळी सोसायटी मतदारसंघातील निकालाबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली होती, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांच्यात सरळ लढत झाल्याने व आमदार शिंदे हे जिल्ह्यातील हेविवेट नेते असल्याने त्यांचे राजकिय कसब या निवडणुकीत पणाला लागले होते. या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील नेत्यांना होती. या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार शिंदे यांचा केवळ एका मताने निसटता पराभव झाला असल्याने राष्ट्रवादी पक्षांसह सहकार पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जावळी सोसायटी मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला होता. कारण एकेकाळी संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे हालवणारे शिंदे आज त्यांच्याच संचालकपदासाठी कडवी लढत देत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे शशिकांत शिंदे या निवडणूकच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय चक्रव्यूहात एकाकी पडलेले पहावयास मिळाले. जिल्ह्यातील अनेक नेते बिनविरोध निवडून गेले असताना शशिकांत शिंदे यांना मात्र केवळ गाफील राहिल्याने निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT