<div class="paragraphs"><p>Shashikant Shinde in Bhilar&nbsp;</p></div>

Shashikant Shinde in Bhilar 

 

Sarkarnama 

पश्चिम महाराष्ट्र

मानकुमरेंनी शशिकांत शिंदेंना व्यासपीठावर बोलवले पण, दुर्लक्ष करीत ते निघून गेले.....

सरकारनामा ब्यूरो

भिलार (ता. महाबळेश्वर) : बेलोशी येथे कळंबे महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांनी व्यासपीठावरून आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना थांबण्याचा इशारा केला पण,  त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत तेथून परतीचा रस्ता धरला. त्याच वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhosale) यांनी मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. त्यांनी समाधीचे दर्शन घेवून व्यासपीठावर आले.

कळंबे महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाचे पडसाद उमटले. एका बाजूला वसंतराव मानकुमरे यांनी जावळी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा नारा व्यासपीठावरून दिला तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी महाराजांच्या समाधीवर आपल्या सहकाऱ्यांसमवेत माथा टेकला आणि कार्यक्रमात व्यासपीठावर जाणे टाळत लांबूनच सर्वांना नमस्कार केला आणि काढता पाय घेतला.

दरवर्षी कळंबे महाराजांच्या समाधी स्थळावर अध्यात्मिक दृष्ट्या सजग असा कार्यक्रम होतो. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील यशामुळे वसंतराव मानकुमरे यांचा आत्मविश्वास दुणावला. कोरोना संकटामुळे दोन वर्षे कार्यक्रमात खंड पडला त्यामुळे वसंतराव भाऊंनी मोठ्याप्रमाणात कार्यक्रम करण्याचा घाट घातला.

व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील,  वसंतराव मानकुमरे, संचालक ज्ञानदेव रांजणे, हणमंतराव पार्टे, कांतीभाई देशमुख , तुकाराम धनावडे, बी. एम पार्टे ही दिग्गज मंडळी उपस्थित होती.  या ठिकाणी आगामी निवडणुकीची वक्तव्ये चालू असतानाच अचानक पहिल्यांदा आमदार शशिकांत शिंदे तसेच माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमित कदम, योगेश गोळे हे मंदिरात आले. या सर्वांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत त्या ठिकाणी काही काळ थांबून आगामी लढाईची व्युहरचना केली.  तेथून बाहेर पडत या सर्वांना उपस्थितांना हात जोडून नमस्कार करीत तेथून जाणे पसंत केले. वसंतराव मानकुमरे हे व्यासपीठावरून आमदार शिंदे यांना थांबण्याबाबत इशारा करीत होते. परंतु त्यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता परतीचा रस्ता धरला. तेवढ्यात आमदार शिवेंदरसिंहराजे भोसले यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यांनी समाधीचे दर्शन घेवून व्यासपीठावर प्रवेश केला.

यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,  सध्या कोरोनामुळे सहकार अडचणीत आहे. निवडणुका ह्या परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे जेवढी निवडणूक बिनविरोध होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करू. परंतु कुणाला जर आव्हानच द्यायचे असेल तर आम्हीही तयार असून वसंतराव मांनकुमरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पॅनेलच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना निवडून आणू. गेल्या निवडणुकीत मोठं मोठ्या वल्गना केल्या परंतु भाऊ त्यात यशस्वी झाले आहेत, हा इतिहास आहे. त्यामुळे कितीही आव्हाने येऊ द्यात आम्ही भिणार नाही, लढण्यासाठी सज्ज राहू.

भिलारेंचे नातू जावळी बँकेचे अध्यक्ष...

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितींकाका पाटील यांचेसमवेत भि.दा. भिलारे गुरुजींचे नातू विक्रम भिलारे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली. आणि जिल्हा बँकेचे जसे काका अध्यक्ष झाले तसेच विक्रम भिलारे हेच आमचे पुढील जावली बँकेचे अध्यक्ष व नेते आहेत हे भाऊंनी सर्वांना दाखवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT