Shashikant Shinde, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Shinde on Jalana Protest : लाठीहल्ल्यावरुन शशिकांत शिंदे भडकले; म्हणाले, भाजपचा सत्तेचा माज उतरवला जाईल...

Umesh Bambare-Patil

Shashikant Shinde on Jalana Protest : मराठा आरक्षण मागणीसाठी जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांवर पोलीसांनी आज अमानुष लाठीचार्ज केला. याचा तीव्र शब्दात निषेध करुन भाजप नेते या प्रकारातून हुकूमशाही असल्याची आठवण करुन देत आहेत. सर्वसामान्यांवर झालेला हा लाठीचार्ज आणि भाजपला सत्तेचा आलेला माज हा येत्या काळात उतरवला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

अंतरवेली (जालना) येथे मराठा Maratha समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस Police लाठीमाराच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या लाठीमाराचा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

आमदार शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी आज अमानुष लाठीचार्ज केला, याचा जाहीर निषेध करतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच सोडवू शकतो अशी वल्गना करणारे भाजप नेते आरक्षणासाठी सामान्य नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ आणतात.

फक्त वेळच आणत नाही तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करून हुकूमशाही असल्याची आठवण देखील करून देत आहेत. सर्वसामान्यांवर झालेला हा लाठीचार्ज आणि सत्तेचा आलेला माज हा येत्या काळात उतरवला जाईल, असा इशार त्यांनी दिला.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT