Sangita Shinde & Dr. Vandana Murkute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपूर पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत सभापती शिंदे यांचे पद अपात्र

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर ( Shrirampur ) येथील पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत सभापती संगीता शिंदे यांचे पद अपात्र ठरवले.

गौरव साळुंके

श्रीरामपूर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर येथील पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत सभापती संगीता शिंदे यांचे पद अपात्र ठरवले. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांना सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाले आहे. Shinde's post is ineligible till the end of the term of Shrirampur Panchayat Samiti

श्रीरापूर येथील पंचायत समितीच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. मुरकुटे, अरुण नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले. पुढे सभापती निवडीच्यावेळी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणाऱ्या पंचायत समिती मध्ये डॉ. मुरकुटे व शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी मिळाली होती. त्यावेळी निवडीच्या आधी तालुक्यात नवे समीकरण निर्माण  झाले.

काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. मुरकुटे यांना घोषित केले. असताना ऐनवेळी संगीता शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापती पद मिळवले.  त्यामुळे शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाईच्या मागणीची याचिका गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती.

या संदर्भात सभापती शिंदे यांनी वेळोवेळी उच्च न्यायालयसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतू सभापती शिंदे यांना न्यायालयात दिलासा न मिळाल्याने अखेर सोमवारी (ता. 25) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत सभापती शिंदे यांचे पद आपात्र ठरविले आहे. निवडीचा पुढील कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर डॉ. मुरकुटे यांना सभापती होण्याचा मान मिळणार असल्याचे मानले जाते. डॉ. मुरकुटे यांच्या वतीने ॲड. दत्ता घोडके, ॲड. समीन बागवान, अॅड. माणिक मोरे यांनी कामकाज पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT