NCP News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP News: रोहितदादांची अनुपस्थिती; जयंतराव म्हणतात, 'माझा कुणाशीही वाद नाही... मी गरीब माणूस'

Pradeep Pendhare

Nagar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राजव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे उपस्थित नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीवर 'मी गरीब माणूस आहे. पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझा कुणाशीही वाद नाही,' असे सांगून आमदार रोहित पवार अधिवेशनाला येतील, असे सांगावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची शिर्डी येथे आजपासून (बुधवार) दोन दिवस राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोठी ताकद लावली आहे. अधिवेशनाला सकाळी ध्वजवंदनाने सुरुवात झाली. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे राज्यातील खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. परंतु या अधिवेशनाला आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीने लक्ष वेधून घेतले. अधिवेशनस्थळीदेखील कार्यकर्त्यांमध्ये याचीच चर्चा होती. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील कलहामुळे रोहित पवार आले नसावेत, अशी विरोधकांमध्ये चर्चा आहे. यावर जयंत पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

कधी, कोण बाहेर पडतील, हे सांगता येत नाही...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिंतन अधिवेशनाला आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीवर टायमिंग साधले. ते म्हणाले, कधी, कोण बाहेर पडतील, हे सांगता येत नाही, असा टोला रोहित पवार यांच्या अनुपस्थितीवर लगावला.

जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादीचे हे अधिवेशन दोन दिवस आहे. शरद पवारसाहेबांनी अधिवेशनाची तारीख जाहीर करताच, आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांना संपर्क करून परदेशी असल्याचे सांगितले होते." तरीदेखील रोहित पवार हे आज सायंकाळपर्यंत अधिवेशनात सहभागी होण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

"जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात कलह सुरू असल्याने रोहित पवार अनुपस्थित राहिल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. यावर जयंत पाटील यांनी मी गरीब माणूस आहे. माझा कोणाशीही वाद होऊ शकत नाही. मी माझ्या पक्षाचे काम करतो आहे. जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन पक्षाचे काम करीत राहणार आहे. रोहित पवार परदेशातून येताच अधिवेशनात सहभागी होतील," असे सांगितले.

बावनकुळे असे विचारत का फिरत आहेत...?

'महाराष्ट्रात ४५ प्लस आणि देशात चारसौ पारची घोषणा देत आहेत. महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुफानापुढे पाला-पाचोळ्यासारखी उडून जातील,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना केला आहे. जयंत पाटील यांनी यावर, 'चंद्रशेखर बावनकुळे गल्ली-बोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे,' असा प्रश्न कशाला विचारत फिरत आहेत? असे विचारण्याची गरज काय? हा प्रश्न विचारण्याची गरज भासण्याचे कारण काय? त्यांच्या प्रश्नातच त्यांचे उत्तर आले आहे,' असा टोला लावला.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT