Satara ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Sabhapati Election : राष्ट्रवादीतून फुटलेल्या लता कर्णे, ऋतुजा शिंदे यांना भाजपची उमेदवारी; सभापती निवडीवर शिवसेना-राष्ट्रवादीचा बहिष्कार

Shiv Sena and NCP Boycott Election : सातारा झेडपी सभापती निवडणुकीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने बहिष्कार टाकत काळ्या फिती लावून आंदोलन केले, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 04 April : सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे दोन सदस्य शुक्रवारी रात्री फोडण्यात आले आहेत, त्यामुळे या दोन्ही पक्षाचे सदस्य काळ्या फिती लावून सभागृहात बसले आहेत, त्यामुळे साताऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपने राष्ट्रवादीतून फुटलेल्या लता कर्णे, ऋतुजा शिंदे यांच्यासह चौघांनी उमेदवारी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बहिष्काराचा निर्णय पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम, शिक्षण आणि आरोग्य, महिला बालकल्याण, समाज कल्याण, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून तेजस्विनी कदम, ऋषिकेश धायगुडे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या लता कर्णे, ऋतुजा विराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भारतीय जनता पक्षाने सदस्य फोडल्याचा निषेध करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या दोन्ही पक्षाचे सदस्य काळ्या फिती लावून सभागृहात दाखल झाले आहेत. लोकशाहीचा गळा घोटणऱ्या प्रशासनाचा विशेषतः पोलिस दलाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT