कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला डिवचलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवी ट्विट करत त्यांनी टीका अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यावरून आता संजय पवारांनी संभाजीराजेंना इशारा दिला आहे. (Shiv Sena Latest Marathi News)
पवार यांनी पराभवानंतर एबीपी माझाशी बोलताना छत्रपतींच्या ट्विटचा समाचार घेतला. ते म्हणाले, छत्रपतींचा आम्ही सन्मान करतो, ते आमचे दैवत आहेत. पण विनाकारण शिवसेनेवर टीका करू नये. त्यांना असं बोलणं शोभत नाही. त्यांना माझी विनंती आहे की, असं करू नका, अशी विनंतीर करत पवारांनी नाहीतर मीही त्याच पध्दतीने उत्तर देईन, असा इशाराही दिला. (Sanjay Pawar criticizes SambhajiRaje Chhatrapati)
मुंबईत शिवसेना भवनाबाहेर छत्रपतींच्या समर्थकांनी फ्लेक्सबाजी करत बदल्याची भाषा केली आहे. त्यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार दुर्दैवी आहे. मी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदर केले आहे. पण आम्ही दैवत मानत असलेल्या छत्रपतींनी शिवसेनेवर टीका करणं चुकीचे आहे. शिवसेनेने माझ्यापेक्षा जास्त सन्मान छत्रपतींचा केला आहे, असंही पवार म्हणाले.
शिवसेनेच वाघ हे जंगातील आहेत, सर्कशीतील नाहीत. छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक ठेवऊ कुठलातरी पक्ष शिवसेनेवर टीका करत आहे. छत्रपतींना असं बोलणं शोभत नाही. त्यांनी असं करू नये, अशी विनंती पवार यांनी संभाजीराजेंच्या ट्विटवर केली. माझ्या पक्षावर कुणी अशाप्रकारे बोललं तर मीही तसंच उत्तर देईन, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते संभाजीराजे?
संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर छत्रपतींनी एक ट्विट केलं होतं. ''वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होयll,'' असं ट्विट संभाजीराजेंनी केलं होतं. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. असा खोटा आव आणणाऱ्यांची लगेचच फजिती होते, असा या ओळींचा अर्थ होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.