Anil Babar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घ्यावं लागेल : शिवसेना नेत्याचा खणखणीत इशारा

तरच शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आपल्याला टिकवायचं असेल तर आमचेही ऐकून घेतलं पाहिजे, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे (shivsena) आटपाडीचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. (Shiv Sena leader warns Mahavikas Aghadi)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने आटपाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आमदार बाबर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. या मेळाव्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. मेळाव्यास युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आटपाडीचे शिवसेना आमदार अनिल बाबर म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला टिकवायचा असेल तर आमचेही ऐकून घेतलं पाहिजे; म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही. आम्ही काही मंत्रीपद मागायला आलो नाही, ना सत्ता मागायला आलोय. फक्त, महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला त्रास होत आहे, अशा शब्दांत अनिल बाबर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पुरेसा निधी मिळाला नसल्याची तक्रार करत शिवसेनेच्या सुमारे २० ते २५ आमदारांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी जास्त मिळतो, अशी शिवसेना आमदारांची तक्रार होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला होता. यापूर्वी पोलिसांच्या बदल्यांवरून शिवसेना नाराजी झाली होती. ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना एका दिवसांत स्टे देण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT