Shekhar Gore
Shekhar Gore Maan Reporter
पश्चिम महाराष्ट्र

दहिवडी नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार...

विशाल गुंजवटे

बिजवडी : पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दहिवडी (ता. माण) येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार आहे, अशी माहिती माण-खटावचे शिवसेनेचे नेते व सातारा जिल्हा बँकेचे नूतन संचालक शेखर गोरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेखर गोरे यांनी म्हटले की, दहिवडी ग्रामपंचायतीवर आपल्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व स्थापित केले होते. दहिवडीत आपल्याला मानणारा मोठा गट असून शिवसेनेच्या माध्यमातून या गटाच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार आहे. नगरपंचायतीच्या या निवडणूकीत शिवसेना सर्व १७ जागांवरती उमेदवारी अर्ज भरणार असून या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून जबाबदारी घेणार आहे.

दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणची नगरपंचायत ही आदर्शवत असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत आपल्याकडे असताना काही दिवसातच आपण ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलला होता. मात्र ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर आमच्या हातून सत्ता गेली. नगरपंचायतींना मोठा निधी येऊनही विरोधकांना दहिवडीचा विकास करता आला नाही. विरोधकांनी या नगरपंचायतीचा फक्त पदापुरता वापर करत सत्ता भोगल्याचीही टीकाही त्यांनी केली.

दहिवडीचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी व विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण यावेळी शिवसेनेच्या माध्यमातूम पॅनेल टाकत मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरणार असल्याचे शेखर गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT