Dhairyashil Mane-Sanjay Mandlik
Dhairyashil Mane-Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur : खासदार मानेंच्या घरावर मोर्चा ; त्यांच्याच काॅलनीतील मंडलिकांना मात्र सूट!

संभाजी थोरात : कोल्हापूर

कोल्हापूर : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी एकनाथ शिंदे गटाची (Eknath Shinde) वाट धरली. या निर्णयामुळे धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या घरावर शिवसैनिकांनी विराट मोर्चा काढला मात्र संजय मंडलिकांच्या (Sanjay Mandlik) घरावर मोर्चा का नाही असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

कोल्हापूर मधील रुईकर कॉलनीत राहणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उद्वध ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांनी मोर्चा काढला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. यावेळी खासदार माने यांना पंधरा दिवसांत कसे निवडून आणले, उध्दव ठाकरे यांनी त्याना मुलाप्रमाणे कशी वागणूक दिली आणि माने यांनी कशी गद्दारी केली याचा पाढा शिवसैनिकांनी वाचला.

धैर्यशील माने यांच्याबद्दलची नाराजी मान्य होऊ शकते, पण रुईकर कॉलनीतच राहणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय मंडलिकांच्या घरावर का मोर्चा काढला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय मंडलिक यांनी सुरवातीला स्वतः बंडखोरांविरोधात मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले बेंटेक्स असल्याची टीका केली होती मात्र शेवटी त्यानीच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून धक्का दिला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी टीका केली मात्र थेट मोर्चा काढून विरोधकरण टाळलं.

आज हातकणंगले विभागाच्या वतीने मोर्चा मुरलीधर जाधव यांनी जाहीर केला होता. मात्र त्यामध्ये संजय पवार आणि विजय देवणे हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्हीही जिल्हा प्रमुख उपस्थित होते. त्यांनी मंडलिक यांचा उल्लेखही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सगळ्या बंडखोरांविरोधात मोर्चे काढले असताना फक्त मंडलिकांकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष का केले जात आहे, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT