Shekhar Gore, Pradip Vidhate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शेखर गोरेंचा दणकून पराभव; राष्ट्रवादीच्या प्रदीप विधातेंचा मोठा विजय

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara DCC) निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे नेते शेखर गोरे (Shekhar Gore) यांचा दणकून पराभव झाला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार व राष्ट्रवादीचे नेते प्रदीप विधाते (Pradip Vidhate) यांनी त्यांचा तब्बल 1 हजार 80 मतांनी पराभव केला आहे. शेखर गोरे आणखी एका मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.

निवडणुकीच्या निकालात अनेकांना धक्के बसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिंकात शिंदे, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला धुळ चारली आहे. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून शेखर गोरे व प्रदीप विधाते यांच्यात लढत होती.

एकूण मते 1964 होती. त्यापैकी 1838 मते वैध ठरली. गोरे यांना केवळ 379 मतं मिळाली. तर विधाते यांनी 1459 मतं मिळवत मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खटाव सोसायटी मतदारसंघात पक्षाला क्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जिल्हा बॅंकेसाठी नंदकुमार मोरे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्याविरोधात उभे राहत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी पवारांनाच आव्हान दिले होते. या निवडणुकीत घार्गे यांचा दहा मतांनी विजय मिळाल्याने थेट अजित पवारांनाच धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार नंदकुमार मोरे यांच्याविरोधात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने या लढतीला महत्त्‍व आले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सोसायटी मतदारसंघावर कायम वरचष्मा ठेवणाऱ्या घार्गे यांची बंडखोरी राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आधीपासूनच दिसत होते.

या निवडणुकीत घार्गे यांना 56 तर मोरे यांना 46 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीने आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जिल्हा बॅंकेसाठी नंदकुमार मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. तर सलग १५ वर्षांहून अधिक काळ या मतदारसंघाचे नेतृत्व प्रभाकर घार्गे यांनी केले आहे. त्यामुळे एका बाजूला सत्ताधारी पक्षाची ताकद व दुसऱ्या बाजूला मतदारांशी घरोब्याचे संबंध अशी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांत सरळ लढत होती. दोन्हीही उमेदवार तुल्यबळ असल्याने या मतदारसंघात मतांची विभागणी कशी होणार, कोण कोणासमवेत जाणार, एखादे नवीन राजकीय समीकरण जुळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT