Shivaji Patil Gokul Mahayuti  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics : 'गोकुळ'मध्ये एका नेत्यामुळे जिल्ह्याचे राजकारण बिघडले, शिवाजी पाटलांचा महायुतीला घरचा आहेर

Shivaji Patil Gokul Mahayuti : जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडत आहे, महायुतीमधील एका नेत्यामुळे हे होत असल्याचा घणाघात आमदार शिवाजी पाटील यांनी केला.

Roshan More

Shivaji Patil News : गोकुळमधे झालेला पराभव मान्य करून पुढे जायला हवे होते. मात्र, एका नेत्याने चार शासन नियुक्त सदस्यांच्या मागणीचा हट्ट धरला आणि त्याला सरकारनेही दुजोरा दिला. ही बाब मला मान्य नाही. अशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडत आहे, असा घणाघात आमदार शिवाजी पाटील यांनी केला. यातून महायुतीला घरचा आहेर दिला.

आजरा तालुक्यातील कोळिंद्रे येथे महालक्ष्मी देवी यात्रेतील देणगीदार व यात्रेसाठी मदत केलेले सर्व खात्यांचे अधिकारी यांचा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते. गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा या मुद्द्यावर त्यांनी मंत्री मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांचा खरपूस समाचार घेतला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील अध्यक्षस्थानी होते.

आमदार पाटील म्हणाले, "गडहिंग्लज तालुकाही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हावा, यासाठी माझा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे." प्रांताधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक सरकारविरोधी घोषणा देत होते. सत्तेत असलेलेच मंत्री मुश्रीफ कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते चुकीचे आहे.असेही पाटील म्हणाले.

तो नेता कोण?

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीतील एका नेत्याने विरोधकांना मॅनेज करून आमच्या पक्षाचा घात केल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला. त्यामुळे तो नेता कोण? याची कार्यक्रमस्थळी चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT