Shivendaraje Bhosale Devendra Fadnavis  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Shivendraraje Bhosale : मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभे राहा, शिवेंद्रराजे भोसले यांचे मराठा बांधवांना आवाहन

Shivendaraje Bhosale Devendra Fadnavis maratha reservation : माझी मराठा बांधवांना विनंती आहे. ज्यांनी दिलंय त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मराठा म्हणून मला अभिमान आहे. मराठा समाजाला पहिले आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांन दिले आहे, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

Roshan More

Shivendra Raje Bhosale News : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे-पाटील देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. मनोज जरांगे पाटील यांना मिळणारा पाठींबा भाजपचे टेन्शन वाढवत आहे. मात्र, भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा समाजाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राजकारणाचा विषय आला की लोकं वेगवेगळा धर्म, जातीच्या चष्मातून बघतात. मात्र, मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले ही वस्तुस्थिती आहे.

'माझी मराठा बांधवांना विनंती आहे. ज्यांनी दिलंय त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मराठा म्हणून मला अभिमान आहे. मराठा समाजाला पहिले आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांन दिले आहे. भविष्यात हे आरक्षण टिकणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र, आरक्षण हायकोर्टात टिकले.', असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

भविष्यात फडणवीसच आरक्षण देतील

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण हायकोर्टात टिकले तसेच ते मुख्यमंत्री असे पर्यंत आरक्षण सुप्रीमकोर्टात देखील टिकेल होते. आरक्षण गेले कधी तर फडणवीस मुख्यमंत्री नसताना आरक्षण गेले. त्यामुळे मी मराठा समाज बांधवांना सांगतो की माझ्या नेत्यावर देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. भविष्यात कोणी आपल्याला आरक्षण देऊ शकतं तर फक्त फडणवीस, असे देखील शिवेंद्रराजे यांनी ठासून सांगितले.

जरांगे पाटलांची टीका

शांतता रॅली निमित्ताने सांगलीत आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. माझ्या विरोधात सागर बंगल्यावर षडयंत्र रचले जाते. मी कोणाला मॅनेज होत नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सागर बंगल्यावर केला जात असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT