Shivendraraje Bhosale, Makrand Patil
Shivendraraje Bhosale, Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजेंची मकरंद आबांनाच साथ...

Umesh Bambare-Patil

सातारा : किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे आमदार म्हणून शिवेंदसिंहराजे भोसले कोणाला मदत करणार, याची उत्सुकता होती. अगदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न झाले. पण, शिवेंद्रसिंहराजेंनी मतदारांच्या मनाचा कौल घेत त्यांची नाराजी कोणाबद्दल आहे, हे ओळखून आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलला साथ देण्याची सूचना केली.

त्यानुसार सातारा तालुक्यातील मतदारांनी पाटील बंधूंच्या पॅनेलला साथ देत मताधिक्य कायम ठेवले. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंची मकरंद आबांनाच साथ मिळाल्याचे निकालातील आकड्यांवरून स्पष्ट झाले. किसन वीर कारखान्याचे सातारा तालुक्यात आठ हजार पाचशे मतदार आहेत. त्यापैकी साडेपाच हजार जणांनी मतदान केले.

साडे तीन ते चार हजारांचे मताधिक्य मकरंद पाटलांच्या पॅनेलच्या उमेदवारांना दिल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार उदयनराजेंनी पहिल्यापासून या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट त्यांनी त्यांच्या मतदारांना योग्य ती भूमिका घेण्याची सवलत दिली होती. शिवेंद्रसिंहराजे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात परदेशात गेले होते. त्यामुळे तेही सक्रिय नव्हते. तरीही अंतिम टप्प्यात त्यांनी मतदारांशी चर्चा करून त्यांच्या मनाचा कौल घेतला. तसेच त्यांची कोणाबद्दल नाराजी आहे, हे समजून घेतल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलला साथ देण्याची भूमिका घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT