Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : उदयनराजेंच्या जावळी दौऱ्यावरुन शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, १५ वर्षानंतर त्यांचे दौरे सुरू झालेत....

Umesh Bambare-Patil

Shivendraraje Bhosale News : खासदार उदयनराजेंनी Udayanraje Bhosale अजून जावळीत लक्ष घालावे. कारण १५ वर्षानंतर त्यांचे हे दौरे सुरु झाले आहेत. लोकांना कळू देत की आपण कोणाला मते दिली होती. आता वेळ निघून गेल्यान स्वत:ची हे वाचविण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी उदयनराजेंच्या जावळी दौऱ्यावरुन केली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर विविश विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर टीकेची झोड उठवली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.

कॉलेजच्या कामाला संरक्षण मिळणे गरजेचे आहे. शहरातील राजकिय नेत्याच्या सांगण्यावरुन काही कार्यकर्त्यांनी जाऊन मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडले. यामागचा त्यांचा नेमका हेतूक काय होता, हे समजू शकलेले नाही. यातून आर्थिक मागणी होऊ नये, तसेच या कामात राजकारण करुन आडवे लावू नये.

जिल्हा प्रशासनाने ठेकेदारांना संरक्षण दिले पाहिजे. दरम्यान, खिंडवाडी येथे मोठ्याप्रमाणात उत्खनन चालू आहे, त्याची रॉयल्टी भरलेली नाही. त्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. खिंडवाडीलगत असलेल्या मोकळ्या जागेवर बाजार समितीची इमारत उभी राहणार की वाद होणार यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, खिंडवाडीतील १७ एकर जागा बाजार समितीच्या नावावर आहे. काही लोकांचा येथे प्लॉट पाडून त्यातून पैसे कमविण्याचा उद्देश होता.

पण, ते त्यांना शक्य झाले नाही. आम्ही प्लॅान करुन ठेवला आहे. फ्रुट मार्केट, भाजीपाला मार्केट, जनावरांचा दवाखाना व सुसज्ज मार्केट यार्ड उभारले जाणार आहे. सुसज्ज व अद्ययावत असे बाजार समितच्या इमारतीचा प्लॅान केलेला आहे. मार्केट शहरातून बाहेर गेल्याने येथील जागाही डेव्हलप करता येईल. मनोमिलन तुटायला खिंडवाडीच्या जागेचा विषय आहे का, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हा प्रश्न त्यांनाचा विचारा पण ते खरंही असू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT