MLA Shivendrasinhraje's supporter Dnyandev Ranjane is contesting from Jawali
MLA Shivendrasinhraje's supporter Dnyandev Ranjane is contesting from Jawali Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शशीकांत शिंदेंचे टेन्शन शिवेंद्रसिंहराजे दूर करणार...

उमेश भांबरे :सरकारनामा

कऱ्हाड : रांजणे हे माझ्याबरोबर असतात. ते, त्यांच्या मंडळींसोबत राष्ट्रवादीतच आहेत. जिल्हा बॅंकेचा संचालक होण्यासाठी इच्छुक होणे काही गैर नाही. थोड्याफार समज-गैरसमजुतीमुळे विषय पुढे गेला आहे. या एक-दोन दिवसात तो विषय मार्गी लागेल, असे सूचक वक्तव्य सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले. दरम्यान या वक्तव्यामुळे आमदार शशिकांत शिंदेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक रंगतदार लढत जावळी सोसायटी मतदारसंघात होत असून राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान उभे केले आहे. रांजणे हे काही मतदारांसह नाॅट रिचेबल आहेत. त्यामुळे शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती.

दुसरीकडे राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याने श्री. रांजणे हे माघार घेतील, या विश्वासावर आमदार शिंदें राहिले. पण, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे यांच्याशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क झाला नाही.

मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावळीतून लढण्यास सांगितले असल्याचे सांगत रांजणे यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. परिणामी शशीकांत शिंदेंची अडचण वाढली आहे. दरम्यान सहकार पॅनेलच्या निवडणुक प्रचारार्थ सहकारमंत्री पाटील यांनी आज आयोजीत केलेल्या मेळाव्यासाठी आमदार भोसले आज येथे आले होते. त्यावेळी रांजणेबद्दल बोलताना ते म्हणाले, रांजणे हे निष्ठावंत आहेत. रांजणे हे माझ्याबरोबर असतात. ते, त्यांच्या मंडळीसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहेत. त्यांनी इच्छुक होणे काही गैर नाही. थोड्याफार समज-गैरसमजुतीमुळे विषय पुढे गेला आहे. मात्र या एक-दोन दिवसात तो विषय मार्गी लागेल, असे सांगीतले. त्यामुळे रांजणेच्या आक्रमक भुमिकेत आमदार भोसले हे मध्यस्थी करतील अशी शक्यता असल्याने शशिकांत शिंदेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुका लागलेल्या सर्व जागांना अडचण येणार नाही. सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार मताधिक्यांनी निवडुण येतील. जावळी तालुक्यात योग्य पध्दतीने निर्णय़ होईल. आमचेही प्रयत्न सुरु आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT