Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale design@apglobale.com
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बॅंकेत उदयनराजेंचा `मोठा विषय` सांगत शिवेंद्रराजेंनी उडविली खिल्ली

सरकारनामा ब्युरो

सातारा ः ड्रायव्हरच्या मुलांच्या बदलीसाठी उदयनराजे जिल्हा बँकेत सभापती रामराजे व बँकेचे चेअरमन यांना भेटायला आले होते. 'तो' त्यांचा मोठा विषय होता. ते आमच्या बैठकीस येतील यासाठी आम्ही सर्व संचालक त्यांची वाट पहात होतो. त्यांचे ज्ञान व एवढ्या उंचीवरील माणूस आमच्या बैठकीत येऊन बसणार यामुळे आम्ही सर्वजण आतूर होतो. पण, ते उडत उडत रामराजेंकडे गेले, अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या 'मोठा विषया'ची खिल्ली उडवली.

सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातारच्या दोन्ही राजांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. आता कोणत्याही विषयावरून दोघ एकमेकांवर सडेतोड टीका करू लागले आहेत. उदयनराजे आज जिल्हा बँकेत आले होते, त्याविषयी शिवेंद्रसिंहराजेंना विचारले असता ते म्हणाले, ''ते बँकेत बैठकीसाठी आले नव्हते. ते सभापती रामराजे आणि चेअरमन यांना खासगीत भेटायला आले होते. मला कळाले की ते महत्वाच्या विषयावर भेटायला आले होते. ज्याचा परिणाम जिल्हा बँकेवर होऊ शकतो. त्यांच्या ड्रायव्हरचा मुलगा बँकेत कामाला आहे. त्याची बदली करून हवी होती. त्यासंदर्भात ते भेटायला आले होते.''

'तो' त्यांचा मोठा विषय होता. आम्ही सर्व संचालक ते बैठकीत येतील यासाठी त्यांची वाट पहात होतो. त्यांचे ज्ञान व एवढ्या उंचीवरील माणूस आमच्या बैठकीत येऊन बसणार यामुळे आम्ही सर्वजण आतूर झालो होतो. पण, ते उडत उडत रामराजेंकडे गेले, असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''आम्ही जमिनीवर राहणारी माणसं आहोत. त्यांची वाऱ्यावरील वरात त्यांनाच लखलाभ होऊ देत. त्यांनी अजून उंच जाता येत असेल तर मोटारसायकल घेऊन जावे. आमचे काहीही म्हणणे नाही. मी आणि सातारकर आम्ही जमिनीवरच राहणार आहोत. त्यांनी उंच उंच उडतच राहावे. त्यांची सगळे कामे वाऱ्यावरची आहेत. दुसऱ्यांनी कामे करायची आणि यांनी सगळ्यांपुढे त्यावर शिक्का मारायचा,'' अशी त्यांची कार्यपद्धती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT