Shashikant Shinde, Makrand Patil, Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde, Makrand Patil, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jawali,Mahabaleshwar APMC Result : महाविकास आघाडीचा धुव्वा : शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे, मकरंद आबांच्या पॅनेलचा विजय

Umesh Bambare-Patil

-महेश बारटक्के

Jawali-Mahabaleshwar APMC Result : जावळी- महाबळेश्वर बाजार समितीचा निकाल आज जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. भाजप, राष्ट्रवादी आघाडीत आमदार शिवेंद्रराजे भोसले Shivendraraje Bhosale, शशिकांत शिंदे Shashikant Shinde आणि मकरंद पाटील Makrand Patil यांच्या एकत्रित शेतकरी विकास पॅनेलला १२ जागांवर विजयी मिळवला. तर विरोधी माजी आमदार सदाशिव सपकाळ व राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. तीन आमदारांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. १८ पैकी सहा जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.

जावळी Jawali, महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले होते. एकुण ९३.८६ टक्के मतदान झाले होते. एकुण २३२२ मतदानापैकी १९५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कृषी व पत बहुउदेशीय सेवा सहकारी संस्थेत केंद्र मेढा 131 कुडाळ 382 महाबळेश्वर 77 तापोळा 52 मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु झाली.

या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांची भाजप व राष्ट्रवादीची युती झाली होती. त्यांनी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत होते. तर विरोधात माजी आमदार सदाशिव सपकाळ व राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार Deepak Pawar यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे पॅनेल अशी लढत झाली होती.

यामध्ये राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत युती केल्याची तक्रार केली होती. त्यावर श्री. पवार यांनी नऊ मे रोजी साताऱ्यात आल्यावर मी याबाबत सविस्तर बोलेन असे सांगितले होते. पण, दीपक पवारांच्या या खेळीचा काहीही परिणाम झाला नाही.

उलट मतदारांनी तीन आमदारांच्या एकत्रित पॅनेलला साथ देत १८ जागा विजयी केल्या. यामध्ये सहा जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर आजच्या निकालात १२ जागा आमदारांच्या शेतकरी पॅनेलच्या विजयी झाल्या आहेत. विरोधी महाविकास आघाडीच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT