Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : ज्यांने त्याने उठायचे अन्‌ क्रेडीट घ्यायचे : शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची फिरकी

Shivendraraje Bhosale शिवजयंती महोत्सवाची माहिती देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंसह त्यांच्या सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवली.

Umesh Bambare-Patil

Satara News : राज्यपाल बदलण्यासाठी प्रक्रिया असते. साधा शिपाई बदलायचा म्हटलं तर एका दिवसात होत नाही. हा तर राज्यपालांचा विषय होता. उदयनराजे Udayanraje Bhosale ज्यावेळी दिल्लीत मोदींना Modi भेटले, त्यावेळी त्यांचेही हेच वक्तव्य होते. त्यांनी लढा केला तर लढाई आज आणि दोन महिन्यानंतर यश आले, असे म्हणता येत नाही. ज्यांने त्याने उठायचे आणि माझ्यामुळे झाले म्हणत क्रेडीट घ्यायचे, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी खासदार उदयनराजेंची फिरकी घेतली.

शिवजयंती महोत्सवाची माहिती देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजेंसह त्यांच्या सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवली. राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी मागेच सांगितले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी भूमिका घेतील. सगळया महाराष्ट्रातील जनतेच्या भावना जाणणारा हा नेता आहे.

राज्यपाल बदलण्यासाठी प्रक्रिया असते. शिपाई बदलायचा म्हटलं तर एका दिवसात होत नाही. हा तर राज्यपालांचा विषय होता. उदयनराजे दिल्लीत मोदींना भेटले त्यावेळी त्यांचेच वक्तव्य होते. त्यांनी लढा केला तर लढाई आज आणि दोन महिन्यानंतर यश आले. ज्यांने त्याने उठायचे आणि माझ्यामुळे झाले म्हणत क्रेडीट घ्यायचे, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंची फिरकी घेतली.

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हा विषय तात्काळ सोडवला जाईल. राज्य शासनाकडून या कामासाठी ११ कोटी उपलब्ध आहेत. त्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवला आहे. येथे दीपमाळ केली जाणार होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकला जाईल. ते बदलण्याची सुचना केली आहे. योग्य ते बदल करून हे काम मार्गी लावले जाईल.

अजिंक्यताराचा शंभर कोटींचा आराखडा

अजिंक्यतारा किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा शंभर कोटीचा आराखडा नगर विकास विभागाला सादर केला आहे. येथे विविध विकास कामे तसेच छत्रपती शाहू महाराजांची माहिती देणारे दालन, ऐतिहासिक इमारतीची डागडुजी करण्यासंदर्भात नियोजन आहे. तसेच लवकरच अजिंक्यतारा रस्त्याचे टेंडर काढले जाणार असून याकरिता निधी मंजूर झाला आहे. सातारा पालिकेने लवकरात लवकर या विषयाची निविदा काढावी,असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT