Shivendraraje News : एका नेत्याने पोवई नाक्यावरील भिंतीवर चित्र काढले तर दुसऱ्या नेत्याने पोवई नाक्यावरच आयलँड उभारण्याचा आग्रह धरला आहे. हा प्रकार म्हणजे नेत्यांचा 'इगो' असून याचा फटका सातारकर आणि शिवभक्तांना बसला आहे, अशी परखड प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई Shambhuraj Desai यांनी पोवई नाका परिसरातील आयडीबीआय बँकेच्या जुन्या आयलँडच्या जागेवर नवीन आयलँड बसवण्याचा प्रशासकीय हट्ट सुरू ठेवला आहे. त्यावरून साताऱ्यात शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या वादात आता आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale भोसले यांनी उडी घेत दाोघांनाही चिमटा घेत सल्ला दिला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, एकाने भिंतीवर चित्र काढले. त्यामुळे दुसऱ्या नेत्याने येथील पोवई नाक्यावर आयलँड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हा प्रकार म्हणजे दोन्ही नेत्यांचा 'इगो' आहे. या इगोमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुंतून पडले आहेत . या इगो चा फटका सातारकरांना बसला आहे.
या प्रकरणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले सामंजस्याची भूमिका घेतील असे वाटत नाही. कारण त्यांचे भिंतीवर चित्र काढण्याच्या संदर्भात बराच राजकीय वादंग झाला होता. आधी चित्र काढले नंतर चित्रकाराला विचारण्यात आले. परत चित्र थांबवण्यात आले. यामुळे बराच काळ राजकीय वादावादी सुरू होती.
उदयनराजे यांच्याकडून सामंजस्याची अपेक्षाही नाही, कारण ते सतत स्वतःच्याच विश्वात असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या युगपुरुषांच्या संदर्भात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.