Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara APMC Result : व्यापारी आणि हमाल, माथाडीतून शिवेंद्रराजेच्या पॅनेलचे उमेदवार विजयी; उदयनराजे गटाला धक्का...

Satara Bazar Samiti: सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शिवेंद्रराजे गटाचे अजिंक्य पॅनेल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, खासदार उदयनराजे गट अशी संयुक्त स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत झाली.

Umesh Bambare-Patil

Satara APMC Result : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमाोजणीत आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale गटाच्या अजिंक्य पॅनेलने आघाडी घेतली असून व्यापारी मतदारसंघातून अमिन कच्छी, बाळासाहेब घोरपडे तर हमाल, माथाडी मतदारसंघातून अनिल जाधव विजयी झाले आहेत. खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale गटाला हा धक्का मानला जात आहे. या मतदारसंघावर खासदार गटाचा डाोळा हाोता.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात हाोते. आमदार शिवेंद्रराजे गटाचे अजिंक्य पॅनेल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, खासदार उदयनराजे गट अशी संयुक्त स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत झाली.

आज सकाळी दहा वाजता मतमाोजणीस सुरवात झाली. यामध्ये आमदार शिवेंद्रराजे गटाच्या अजिंक्य पॅनेलने खाते उघडत व्यापारी मतदारसंघातील दाोन्ही जागा जिंकल्या आहेत. यातून अमिन कच्छी व बाळासाहेब घोरपडे विजयी झाले आहेत. तर हमाल, माथाडी मतदारसंघातून अनिल जाधव विजयी झाले आहेत. खासदार उदयनराजे गटाला हा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT