Sandipan Bhumare
Sandipan Bhumare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बंडखोर मंत्री संदीपान भुमरेंना म्हाडाची लॉटरी; घरासाठी तरी औरंगाबादमध्ये येणार का?

प्रकाश बनकर

औरंगाबाद :शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या (Shivsena) आता ३८ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. अपक्ष आमदारांना धरुन हा आकडा ४६ पर्यंत जातो. पहिल्या दिवशी त्यांच्यासोबत केवळ १८ आमदार होते, मात्र हळू हळू आकडा वाढत आहे. याच बंडखोर गटासोबत जाणारे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना आज म्हाडाची लॉटरी लागली आहे. म्हाडाच्या चिकलाठाणा येथील घरासाठी झालेल्या ऑनलाईन सोडतीत आमदार कोट्यातून म्हाडाचे घर लागले आहेत. त्यामुळे आता मंत्री घराची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी तरी औरंगाबादेत येणार का? या विषयी चर्चा सुरु झाला आहे.

म्हाडाची मराठवाड्यातील बाराशे सदनिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने सोडत घेण्यात आली. आठही जिल्ह्यातून यासाठी ११ हजारहून अधिक अर्ज आले होते. म्हाडातर्फे विविध गटासाठी काही सदनिका राखीव ठेवण्यात येतात. यातूनच राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे विद्यामान व माजी सदस्यांसाठी दोन टक्के सदनिका राखिव ठेवण्यात येतात. याच कोट्यातून भुमरे यांनी घरासाठी अर्ज केला होता.

अल्प उत्पन्न गटातून (एलआयजी) चिकलठाणा येथील म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनीही अर्ज केला होता. यात एल-२,२,२०२ क्रमांकाचा प्लॉट भुमरे यांना लागला आहे. आमदार कोट्यातून एकच अर्ज आला होता. राज्यातील राजकीय उलथापालीत सहभागी झालेल्या भुमरे यांच्यासाठी ही एक प्रकारची लॉटरी असल्याचे बोलले जात आहे.

अनेक वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले संदीपान भुमरे यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले. शिवसेनेतर्फे पैठण मतदारसंघातून भुमरे यांना पाच वेळा उमेदवारी देण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर महाविकास आघाडी सरकारमध्ये भुमरे यांना कॅबीनेट मंत्रीपदही देण्यात आले. एवढे होऊनही भुमरे यांनी बंडखोरी केली. सध्या ते गोवहाटी येथे एकनाथ शिंदे सोबत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT