sanjay pawar  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT Vs Congress : ठिणगी पडली! “...तर काँग्रेसला हिसका दाखवू”; शिवसैनिकांनी घेतली बाळासाहेब ठाकरेंची शपथ

Maha Vikas Aghadi News : महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. यातच त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. येथून जयश्री जाधव काँग्रेसच्या तिकीटावर पोटनिवडणुकीत निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसनं या जागेवर दावा केला आहे. मात्र, सहा वेळा कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर फडकविल्यानं शिवसेनाही मागे हटण्याचं नाव घेत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिघांनी येथून लढण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

महाविकास आघाडीचं ( Mahavikas Aghadi ) जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेसला गेल्याचं निश्चित आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटानं उत्तर कोल्हापूर मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. त्यासंदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भावना लक्षात घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज मेळावा घेण्यात आला. तेव्हा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत, उत्तरची जागा न मिळाल्यास जिल्ह्यात काँग्रेसला हिसका दाखवणार, असा इशारा शिवसेना ठाकरे गटानं दिला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी मन मोठं करावं…

या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, संपर्कप्रमुख विजय देवणे, मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा रोष दिसून आला. सहावेळा या मतदारसंघावर शिवसेनेचा ( Shivsena ) भगवा फडकवला आहे. पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीतही जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आता मन मोठं करावं. आणि ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडावी, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

पक्षाचा आदेशच अंतिम…

“कोल्हापूर उत्तरची जागा ही शिवसेना ठाकरे गटाचीच आहे. ती ठाकरे गटालाच मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) जो काही निर्णय घेतील त्यामागे शिवसैनिक उभे राहतील. पक्षाचा आदेशच अंतिम असेल,” असे संजय पवार यांनी स्पष्ट केले.

पक्षांनी प्रत्येकवेळी गृहीत धरू नये...

“कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेची होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या गादीचा मान राखत मन मोठे करून ही जागा काँग्रेसला दिली. पोट निवडणुकीतही शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. असं असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला मिळालाच पाहिजे. उत्तर मधून उमेदवारी कोणालाही मिळाली, तरी आम्ही उद्धव ठाकरेंचा आदेश मानून काम करेल. पण, प्रत्येक वेळी इतर पक्षांनी शिवसैनिकांना गृहीत धरू नये,” असा इशारा शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT