Satara APMC Dispute sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara APMC News : खासदार उदयनराजेंना धक्का; खिंडवाडी येथील जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने...

Vikram Pawar विक्रम पवार यांनी म्हटले की, १९९० पासून खिंडवाडी येथील जागेसंदर्भात कायदेशीर लढाई सुरू होती. १९९० मध्ये खासदार उदयनराजे यांच्या कुळांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.

Umesh Bambare-Patil

Satara APMC News : खिंडवाडी येथील १५ एकर जागेचा निकाला बाजार समितीच्या बाजूने लागला असून सर्व कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीच्या ताब्यात जागा मिळाली आहे. लवकरच या जागेवर कै. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उभारले जाईल, अशी माहिती सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या पत्रकात विक्रम पवार यांनी म्हटले की, १९९० पासून खिंडवाडी येथील सातारा बाजार समितीच्या Satara APMC जागेसंदर्भात कायदेशीर लढाई सुरू होती. १९९० मध्ये खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांच्या कुळांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सुमारे १६ वर्षे उच्च न्यायालयाने या जागेवर काहीही करण्यास स्थगिती दिली होती. तसेच २००८ मध्ये कुळांनी पुणे आयुक्त यांच्याकडे अपील केले होते.

२०१० मध्ये पुणे आयुक्तांनी बाजार समितीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे पैसे भरून जागेचा ताबा घेण्याचे आदेश बाजार समितीला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीने १२ लाख ५० हजार रूपये भरून जागेचा ताबा घेतला. २०११ मध्ये पुन्हा कुळांनी उच्च न्यायालयात अपील केले.

तसेच २०१७ मध्ये खासदार उदयनराजेंनी स्वत याचिका दाखल केली होती. २०२२ मध्ये पुन्हा बाजार समितीच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर बाजार समितीने पोलिस बंदोबस्त घेऊन त्या जागेवर व्यापारी संकुल उभारणीचे काम हाती घेतले. मात्र, खासदार उदयनराजेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर निर्णय झाला नाही आणि तुम्ही जागा ताब्यात कशी घेताय, या मुद्दावरून वादावादी झाली होती. दरम्यान, शुक्रवार (ता. १४) दिल्ली सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाजूने ख्यातनाम वकिल ॲड. अभिषेक मनुसिंघवी यांनी युक्तीवाद केला. तर बाजार समितीच्या वतीने अॅड. शाम दिवाण आणि ॲड. अभय अंतुरकर यांनी बाजू मांडली.

बाजार समितीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून सर्वोच्च न्यायालयाने खिंडवाडीतील जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने दिला आहे. लवकरच कै. अभयसिंहराजे व्यापारी संकुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ केला जाणार असून काहीही झाले तरी सुसज्ज व्यापारी संकुल जनतेच्या साोयीसाठी उभारले जाणार आहे.

ज्यावेळी या जागेवर वादावादी झाली हाोती. त्यावेळी पोकलॅनच्या सहाय्याने बाजार समितीचा कंटेनर तोडण्यात आला होता. त्याची नुकसान भरपाई म्हणून दोन लाख १० हजार रूपये खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या बॅँक खात्यावर जमा केली आहे. सातारा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकसात भर घालणारा हा प्रकल्प बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या पुढाकाराने लवकरच मार्गी लावला जाईल, असेही श्री. पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT