Satyajeet Patankar, Shambhuraj Desai
Satyajeet Patankar, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan APMC Result : पाटणकरांना धक्का; पालकमंत्र्याच्या पॅनेलने ग्रामपंचायतीच्या चारही जागा जिंकल्या

Umesh Bambare-Patil

-जालिंदर सत्रे

Patan APMC Result: पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर Satyajeet Patankar यांना मोठा झटका बसला आहे.

पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात हाोते. येथे पारंपरिक पालकमंत्री शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर गटात अटीतटीची लढत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघ जिंकून मंत्री देसाई यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.

पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत.

तर व्यापारी मतदारसंघाततून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब महाजन( ३३६ मते ) अरविंद पाटील (३२३) मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा झटका बसला असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण भिस्त सोसायटी मतदार संघावर आहे. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT