Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Shinde Vs Rohit Pawar | रोहित पवारांना धक्का : तीन ग्रामपंचायतींवर राम शिंदेंचे वर्चस्व

सरकारनामा ब्युरो

Ram Shinde Vs Rohit Pawar : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्तासंघर्ष आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होताच कर्जत तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत तीन ग्रामपंचायतींवर राम शिंदेंनी आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. हा रोहित पवारांसाठी धक्का समजला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला होता. त्यानंतर राम शिंदे यांचे अनेक विश्वासू साथीदार त्यांना सोडून रोहित पवारांच्या गटात गेले. यातच कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता गेली. या मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व पुन्हा प्रस्तापित व्हावे यासाठी राम शिंदे यांना विधानपरिषदेचे आमदार करावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यानुसार राम शिंदे यांना भाजप नेत्यांनी विधानपरिषदेची संधी दिली.

विधानपरिषदेचे आमदार होताच राम शिंदे यांची कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढली. शिंदेंच्या आमदारकीमुळे कर्जत व जामखेड तालुक्यांतील भाजप कार्यकर्त्यांत नवसंजीवनी मिळाल्याची स्थिती आहे. अशातच तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळाले.

कोरेगाव ग्रामपंचायतीत 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 तर कुळधरणमध्ये 13 पैकी 7 उमेदवार भाजपचे निवडून आले. या विजयामुळे राम शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT