Miraj newsLatest News
Miraj newsLatest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक! मिरजेतील 9 जणांची आत्महत्या नसून हत्या; दोघांनी जेवणातून दिले होते विष

सरकारनामा ब्यूरो

सांगली : मिरज (Miraj News) तालुक्यातील म्हैसाळ मध्ये विषप्राशन करून एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या केल्याचे बोलले जात होते मात्र, या घटनेला आता वेगळे वळण लागले असून ही घटना आत्महत्या नसून घातपात करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वनमोरे परिवारातील 9 सदस्यांना दोन जणांनी जेवणातून विष देत त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Miraj Crime Latest News)

याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सरवदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 30 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट 59 सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

मयत डॉ. माणिक बल्लापा वनमोरे व पोपट यलाप्पा वनमोरे यांची गुप्त धनाबाबत एका अनोळखीसोबत भेटी होत होत्या. त्यासाठी वनमोरे यांनी वेळोवेळी समोरच्या व्यक्तीस पैसे दिले होते. ती व्यक्ती रात्रीच्या वेळी म्हैसाळ येथे वनमोरे यांच्या घरी येत होती, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे डॉ. वनमोरे यांच्या घरी येणाऱ्या व्यक्तींचा तपास केल्यानंतर सदर व्यक्ती ही सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अब्बास आणि धीरजला सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले. 19 जून रोजी दोघे संशयित म्हैसाळमधून येवून गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्तींचा गुन्ह्यातील सहभागाबाबत सखोल चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान या घडलेल्या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी अजून काय उलगडा होतो. हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आर्थिक कारणावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पोलिसांना मयताच्या खिशात चिट्ठी सापडल्याने याप्रकरणाची कसून तपास सुरू करण्यात आली होती. तर संबधित ठिकाणी संशयास्पद सापडलेल सर्व नमुने फॉरेन्सिक लॅब ला पाठवण्यात आले होते. यातून काय ते समोर येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली होती. त्यानुसार हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मयत झालेल्या 9 मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT