vishal Phate Scam
vishal Phate Scam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बार्शी स्कॅमबद्दल विशाल फटेकडून धक्कादायक माहिती: पोलिसही चक्रावले

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta)अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याला न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. फटेला याला आधी न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस (Police) कोठडी दिली होती. 8 दिवसांच्या पोलिस कोठडीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल फटे (Vishal phate Scam) याने शेअर मार्केटमध्ये (share Market) कोणतीच गुंतवणूक केली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. फटेने दिलेल्या माहितीमुळे गुंतवणूकदारांना आणि पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

फटे यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक असल्याने पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पोलीसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पोलिस कोठडीत असल्यानंतरच आरोपीची चौकशी करता येते. त्याला न्यायालयीन कोठडीत म्हणजे कारागृहात पाठविण्याची विनंती पोलिसांनीच केली. त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आता विश्लेषण करून पुढील रणनीती आता पोलिस आखत आहेत. आतापर्यंत त्याने कसे पैसे गोळा केले, ते कुठे गुंतवले, त्यात कोण सहभागी होते याची माहिती पोलिस घेत होते, त्यामध्ये फटेने शेअर मार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक केले नसल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत 99 तक्रारदारांनी फटेविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. त्या तक्रारींची शहानिशा पोलिसांना करायची आहे. त्यामुळेच आता आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तपासत पोलिसांना माहिती मिळाली की, फटे एकाकडून पैसे घेऊन तो दुसऱ्यांना द्यायचा. गुंतवणूकदारांनी दिलेली रक्कम वरचेवर फिरवत होता. लोकांना परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने अनेक जणांना त्याने दुसऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दिले. मात्र, यामुळे लोकांचे देणे वाढले. ही गोष्ट लक्षात आल्याने फटे पसार झाला होता.

दरम्यान, विशाल फटे याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. फटेविरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी फिर्यादी दीपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी वडील व भावाला अटक केल्यानंतर विशाल फटे पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती.

विशाल फटे याने बार्शीसह राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. फटे विरोधातील तक्रारींचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत 99 जणांनी तक्रार दिलेली आहे. यामुळे फसवणुकीचा आकडाही वाढून 20 कोटी रुपयांवर पोचला आहे. फटेने फसवणूक केल्याप्रकरणी पुढे आलेले बहुतांश गुंतवणूकदार हे बार्शीतील आहेत. तसेच, उस्मानाबाद आणि पुण्यातील काही जणांचाही समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखा या तक्रारदारांच्या कागदपत्रांची तपासणी करुन फसवणुकीची आकडा निश्चित करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT