Satara Dcc Bank Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politic's : ॲड उदयसिंह उंडाळकर अन्‌ धनाजी पाटलांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; उंडाळकर गटाचे मतदान सहलीवरून थेट मतदान केंद्रावर दाखल

Satara Dcc Bank Voting : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. कराड सोसायटी गटात ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर आणि धनाजी पाटील यांच्यात लढत आहे. धनाजी पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह मतदान केंद्रावर दाखल झाले.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 01 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज (रविवारी, ता. ०१ नोव्हेंबर) सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला. कराड सोसायटी गटातील उमेदवार ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर विरुद्ध धनाजी पाटील यांच्यात लढत होत आहे. सकाळी दहाच्या सुमारास धनाजी पाटील हे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत मतदारांना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले, तर अकराच्या सुमारास ॲड. उंडाळकर हे मतदान केंद्रावर दाखल झाले.

मतदानाच्या अगोदर सहलीवर गेलेल्या मतदारांना घेऊनच उंडाळकर आले होते. धनाजी पाटील यांच्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब पाटील, तर उंडाळकर हे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत एकत्र आले होते, त्यामुळे पाटील आणि उंडाळकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शक्तीप्रदर्शन केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी गटातील उमेदवारांसाठी आज मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, कराड शहर पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, पोलिस निरीक्षक विकास धस यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान, धनाजी पाटील यांचे समर्थक आज सकाळी दहाच्या सुमारास माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत मतदान केंद्र परिसरात दाखल झाले. त्यांची लाईन लावून मतदानासाठी त्यांना मतदान केंद्रात सोडण्यात आले.

दरम्यान, अकराच्या सुमारास ॲड उंडाळकर हे कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्यासमवेत मतदारांना घेऊन मतदान केंद्र परिसरात दाखल झाले. त्यानंतर त्यांचीही लाईन लावून त्यांना मतदान केंद्रात सोडण्यात आले.

ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर आणि धनाजी पाटील समर्थकांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदानासाठी हजेरी लावली. उंडाळकर गटाचे मतदार सहलीवरून थेट मतदान केंद्रातच दाखल झाले. त्यामुळे कराडमधील शक्तीप्रदर्शन सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT