Satara, 23 November : माण तालुक्यातील भांडवली येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नुकत्याच झालेल्या पक्षांतराच्या घटनेवर अप्रत्यक्ष भाष्य केले. ‘राजकारण म्हणजे नुसती नेतेगिरी नाही, तर विकासकामेही करावी लागतात. एकत्र येऊन गावाचा विकास साधा. नको त्या माणसांच्या नादाला लागू नका,’ अशा शब्दांत सोनिया गोरे यांनी टीका केली आहे.
सोनिया गोरे म्हणाल्या, भाऊ (जयकुमार गोरे) ज्याला सांगेल, त्याला उभा करून डोळे झाकून आपण मतदान करत होता. पण, ती लोकंसुद्धा प्रामाणिकपणे, निष्ठेने भाऊंसोबत राहिली नाहीत. या भागातील जिल्हा परिषदेचा माणूस (आंधळी गटातून शेखर गोरेंच्या पत्नी सोनल गोरे भाजपकडून निवडून आल्या आहेत) दुसऱ्या पक्षात गेला, त्याला काय म्हणायचं, ते कळत नाही.
सरकारने नियम काढला पाहिजे. राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेलं पाहिजे आणि तिथं परत आपला माणूस बसवता आला पाहिजे. एकत्र येऊन गावाचा विकास साधा. नको त्या माणसांच्या नादाला लागू नका, असा टोलाही सोनिया गोरे यांनी या वेळी लगावला.
सोनिया गोरे म्हणाल्या, एक चांगला नेता, चांगला कार्यकर्ता, चांगला विकासपुरुष शोधण्यासाठी राजकारण करायचं असतं. चार पैसे दिल्याने कोणीही नेता होऊ शकत नाही. राजकारण म्हणजे नुसती नेतेगिरी नाही, तर त्याला विकासाची कामेही करावी लागतात.
सर्वत्र दुष्काळ असताना माण-खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता जाणवू नये, अशी परिस्थिती मंत्री गोरे यांनी पाणी आणून निर्माण केली आहे. पाण्याची भांडी तयार केल्याने अजून आंधळी गटात आपल्याला पाण्याची कमतरता जाणवत नाही. अजूनही जलसंधारणाची कामे आपण करणार आहोत, असे सोनिया गोरेंनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.