Kolhapur SIR news : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामधील 10 मतदार संघातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विधानसभेतील 10 पैकी 7 आमदारांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मतदान या मोहिमेत घटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदारसंघांमध्ये राजकीय नेत्यांच्या लढतीत प्रचंड चुरस पाहायला मिळणार नाही. शिवाय धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदारांची घट झाली आहे. अनेक मतदाराने स्थलांतर केल्याने त्यांची नावे या मतदार यादीतून उडाली आहेत. शिवाय अनेक जण बाहेरगावी कामानिमित्त वास्तव्यास असल्याने त्या ठिकाणी आणि कोल्हापूर मध्ये देखील त्यांची मतदार नोंदणी असल्याने अनेकांनी केवळ एकाच ठिकाणी एसआयआर प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील मतदार आणि गावातील मतदान वगळून ते शहरात किंवा मुंबई पुणे यासारख्या मेट्रो सिटीत मतदान ठेवण्यास पसंती दिली आहे. त्याचा परिणामही जिल्ह्यातील मतदार वगळण्यावर झाला आहे. विधानसभेतील सात आमदारांना जे मताधिक्य मिळाले, त्याच्या दुप्पट एस आय आर मोहिमेत मतदान या मोहिमेत यादीतून घटले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके,आमदार हसन मुश्रीफ,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. तर आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघांमध्ये मताधिक्यापेक्षा जास्त मतदान या मोहिमेत नव्याने समावेश झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक विरोधक उमेदवारांनी मतदान वाढवण्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारांवर केला होता. त्यामुळे या मोहिमेतून ही आकडेवारी समोर आल्यानंतर हे मतदार नेमके कसे गायब झाले, याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत.
मतदारसंघातील आकडेवारी पुढील प्रमाणे (मतदार संघ - आमदार - मताधिक्य - घटलेले मतदान ) -
कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर -29563- 81620
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक -17630-67950
करवीर - चंद्रदिप नरके -1976-19783
राधानगरी - प्रकाश आबिटकर -38159-34061
कागल - हसन मुश्रीफ -11582-29019
शाहूवाडी- विनय कोरे -36053-28245
चंदगड - शिवाजी पाटील - 24134-28618
हातकणंगले - अशोकराव माने -46249-40439
इचलकरंजी - राहुल आवाडे - 56811-62269
शिरोळ - राजेंद्र पाटील - यड्रावकर -40816-47354
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.