Crime karad
Crime karad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने केला सख्ख्या बहिणीचा खून

सचिन शिंदे

कऱ्हाड : कराडातील वाखाण भागातील विवाहिता उज्वला ठाणेकरच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून तिच्या सख्ख्या बहिणीसह तीच्या प्रियकराला आज सकाळी अटक केली. ज्योती सचिन निगडे (वय २७, बैलबाजार रस्ता, मलकापूर) व सागर अरुण पवार (२६ रा. साईनगर, मलकापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना चार ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

ज्योतीचा नवरा व उज्वलाच्या खूनातील फिर्यादी सचिनसोबतच्या उज्वलाच्या अनैतिक संबंधाच्या रागातून ज्योतीने प्रियकरासोबत तीचा काटा काढल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. उज्वला राहत असलेल्या मागील बाजूच्या शेतातून दोघेजण तीच्या घरी आले. तीचा निर्घृणपणे खून करून त्याच रस्त्याने नदीच्या कडेने ते पसार झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

उज्वला ठाणेकरच्या खून प्रकरणात कराड शहर पोलिस व सातारच्या एलसीबीच्या पथकाने चौवीस तासात खूनाचा उलगडा केला. सौ. उज्वलाचा गळा चिरून निर्घृण खून झाला होता. त्या प्रकरणात तिची सख्खी बहिण ज्योती हिच्या भोवती संशयाचे वलय होते. त्यानुसार काल रात्री तिला तिचा प्रियकर सागर पवारसहीत पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशीरा त्यांनी खूनाची कबुली देत कारण स्पष्ट केले.

ज्योती व सागरला न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. उज्वलाच्या घरात शेतातील रस्त्याने दोघेही शिरले. तेथे सचिनसोबत असलेल्या संबंधावरून त्यांचा वाद झाला. त्यावरून चिडून त्या दोघांनीही उज्वलाला माराहाण करत तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. त्यांच्यात बराच काळ झटापट सुरू होती. त्यात उज्वलाच्या हातात ज्योतीच्या केसांचा पुंजकाही आढळून आला आहे. उज्वलाच्या हातात केस सापडल्याने पोलिसांचा ज्योती भोवती संशय बळावला. एलसीबीने रात्री उशीरा त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरू केला.

बराच काळ दोघांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अखेर त्यांनी खूनाची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही खून प्रकरणात अटक केली आहे. ज्योती व सागर यांनी धारदार शस्त्राने उज्वलाचा गळा चिरताना झटापट झाल्याने साऱ्या घरात रक्त पसरल्याची कबुली दोघांनी दिली आहे. उज्वलाचे मेव्हणे व ज्योतीचे पती सचिन निगडे फिर्याद असून निगडेंचे उज्वलासी असलेल्या अनैतिक संबंधांवरून ज्योतीही निगडेला सोडून बाजूला राहत आहे. पोलिसांची तपासाची चक्रे फिरल्यानंतर ती माहिती समोर आली. त्यानुसार एलसीबीने उज्वलाची बहिण ज्योतीला रात्री ताब्यात घेतल्यानंतर पुढे उलगडा झाला आहे. त्यात सागर पवार हा तीचा प्रियकरही त्यात सहभागी आहे, असी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT