Six former corporators of MIM Jion NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MIMच्या सहा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सत्ता गेल्यानंतरही तौफिक शेख यांनी शब्द पाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तौफिक शेख यांच्यासह त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी (माजी नगरसेवक) राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : ‘एमआयएम’चे (AIMIM) माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी शब्द पाळत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता गेल्यानंतरही पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत तौफिक शेख यांच्यासह त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी (माजी नगरसेवक) राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. या माजी सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने एमआयएमला सोलापुरात (Solapur) भगदाड पडले आहे. (Six former corporators of MIM from Solapur join NCP)

तस्लिम शेख, तौफिक शेख, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, शाजिया शेख आणि वाहिदा शेख अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सहा माजी नगरसेवकांची नावे आहेत. माजी जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांनी या सहा जणांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

राज्यातील सत्तांतरामुळे या माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश रखडला होता. मात्र, तौफिक शेख यांनी अगोदर जाहीर झाल्याप्रमाणे आपण राष्ट्रवादीतच प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी बोलताना तौफिक शेख म्हणाले होते की, सत्ता जाने के बाद कुछ लोग पल्टी मारते है, पर हमारी नियत साफ है, हमने राष्ट्रवादीको जो जुबान दी थी ओ निभाऐंगे, सोलापूर महापालिका में राष्ट्रवादीका झंडा लहराऐंगे, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असताना आम्ही त्यांना पक्षात येण्याबद्दल शब्द दिला होता. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही आमच्या निर्णयात बदल झालेला नाही. आम्ही आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, असे शेख यांनी या वेळी बोलताना सांगितले. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एमआयएमला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. कारण हे सहाही नगरसेवक मागच्या निवडणुकीत एमआयएमच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT