Solapur, 11 April : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिराच्या परिसरात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जोरदार वादंग झाला होता. मराठा आणि धनगर समाजाने सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आजही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवम भारत वाघमोडे (वय २७), बाळू नवनाथ वाघमोडे (वय ३१), सतीश हनुमंत वाघमोडे (वय २५), बंडू दिगंबर वाघमोडे (वय ३५), अरुण सुभाष वाघमोडे (वय ३२), नितीन सुरेश वाघमोडे (वय ३५, सर्व रा. अंजनगाव, ता. माढा) या सहा जणांना अटक (Attack) करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या प्रकरणावरून अंजनगाव (Anjangaon) येथे तणाव निर्माण झाला होता. पुतळा बसवण्याच्या जागेबाबत मतभेद झाल्याने गावातील दोन गट आमने सामने येत आंदोलन केले होते. मात्र, परिस्थिती चिघळू नये, म्हणून प्रशासनाने हस्तक्षेप करत समन्वयाने जागेची मोजणी करून प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला होता.
शासनाने काढलेल्या जागेच्या मोजणीच्या तोडग्यानुसार जागेची मोजणी केली जात होती. तेव्हा काहींनी मोजणी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून अडथळा आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सहा संशयितांना अटक केली आहे.
अंजनगाव येथील जागेची मोजणी करताना अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गावातील सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.
यापूर्वी दहा जणांना अटक
काहींनी पोलिसांवर दगडफेक करत त्यांच्या दिशेने तोफा (फटाके/स्फोटक स्वरूपातील साधने) वाजवत जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे यापूर्वीच या प्रकरणी १२ जणांना पोलिसांनी अटक केली होती, त्यापैकी दहा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.