Dilip Walse Patil - Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dilip Walse Patil - Shetti : "...म्हणून 'स्वाभिमानी'ने आंदोलन मागे घ्यावे!"; मंत्री वळसे पाटलांची शेट्टींना विनंती

Swabhimani Shetkari Sanghatna Protest : " साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होऊन तीन महिने झाले, तरीही..."

Deepak Kulkarni

Mumbai News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आता दीड महिना पूर्ण होत आला आहे. या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या मागण्या अद्यापही मार्गी लागलेल्या नाहीत. सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, कारखानदार यांच्या अनेक बैठका निष्फळ ठरल्याने संघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे.

याचवेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीनंतर वळसे पाटलांनी ऊस उत्पादकांचे व्यापक हित लक्षात घेऊन आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले आहे.

सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील (Dilip Walse Patil) यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, वाढीव सदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कारखान्यांचे तसेच शेतकऱ्यांच्याच नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेता हे आंदोलन मागे घ्यावे असे वळसे पाटलांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वळसे पाटील म्हणाले, साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होऊन तीन महिने झाले, तरीही कोल्हापूर आणि सांगली परिसरातील जवाहर सहकारी साखर कारखाना, श्रीदत्त सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी साखर कारखाना,पंचगंगा सहकारी साखर कारखाना आणि गुरुदत्त कारखाना (खासगी) हे साखर कारखाने सुरु होऊन शकलेले नाहीत.त्यामुळे साखर कारखान्यांचे नुकसान होत आहे.

तसेच ऊस उशिरा तोडला जाणार असल्यामुळे त्याचा परिणाम उसाच्या उताऱ्यावर होणार आहे, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर ऊस तोड मजुरांना काम नसल्याने, त्यांचा रोजगार बुडत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून हे आंदोलन मागे घ्यावे.अन्यथा या कारखान्यांचा गळीत हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. (Swabhimani Shetkari Sanghtana)

...त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती बिघडणार!

एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे बंधनकारक आहे.मात्र, एफआरपीपेक्षा जास्त दार मागणे हे व्यवहार्य नाही.त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती बिघडू शकते,असे वळसे पाटील यावेळी म्हणाले.ऊसावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांचे हिट लक्षात घेता आंदोलन मागे घेऊन कारखाने सुरु करायला परवानगी द्यावी, असे आवाहन वळसे पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांना केले.

शेट्टींचा सरकारसह कारखानदारांना इशारा...

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांसोबतच्या बैठकीनंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सहकारमंत्र्यांसमोर आम्ही एक नव्हे तीन पाऊल मागे आलो आहे.त्यांना शेवटचं सांगितले आहे,त्यांना संयमाने आणि शांतपणे सांगितले आहे.आम्ही शेवट 100 रुपये घेण्यास तयारी दाखवली आहे.त्याखाली एक रुपया घेणार नाही.

बुधवारी संध्याकाळपर्यंत कारखानदारांनी मागील उचल जाहीर नाही केली, तर आमचे आंदोलन सुरूच राहील.पण जाहीर केल्यास आंदोलन न करण्याचा विचार केला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारसह कारखानदारांना दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT