Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik  
पश्चिम महाराष्ट्र

तर संघर्षाची धार कमी होईल: धनंजय महाडिकांना अपेक्षा

सरकारनामा ब्युरो

सुनील पाटील

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या कोल्हापूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्वतंत्रपणे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे उमेदवार माजी आमदार अमोल महाडिक (Amol Mahadik) व शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांना धन्यवाद दिले. त्याचवेळी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाडिक व पाटील कुटूंबियातील संघर्षाची धार कमी होईल, असा विश्‍वास माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी व्यक्त केला.

सतेज पाटील म्हणाले, भविष्यात राजकीय निवडणूका होत राहतील. पण भाजपचे उमेदवार अमोल महाडिक व अपक्ष उमेदवार शौमिका महाडिक यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेवून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याबद्दल त्या दोघांनाही मी धन्यवाद देतो. शेवटी निवडणूका या होतच राहतील, पण त्या वैयक्तिक पातळी होऊ नयेत, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. 

दरम्यान, कॉंग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव, राज्यातील या दोन निवडणूक बिनविरोध झाल्या पाहिजेत यासाठी रजनीताई व प्रज्ञा सातव यांची निवडणूक बिनविरोध झाली होती. यासाठी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धुळे नंदुबार आणि कोल्हापूर जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार ही निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही आघाडीवर होतो. 270 मतांची मॅजिक फिगर आम्ही गाठली होती. याची सर्वांना माहिती होती. पण, राज्याच्या पातळीवर सामंज्यसाची भूमिका घेण्याचे राज्यपातळीवर ठरले आहे. त्यातून या निवडणूका बिनविरोध होतील, असं ठरल आहे. 

धनंजय महाडिक म्हणाले की, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाडिक आणि पाटील कुटूंबातील संर्घषाची धार कमी होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी एक पाऊल मागे यायला लागले तरी चालेल, पण कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे, असेही महाडिक यांनी सांगितले. 

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे मतदारांच्या निराशा झाली आहे. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मिस्किलपणे बोलताच एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT