Nitin Patil, Kirit Somayya sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तर, आम्हाला किरीट सोमय्यांकडे जावे लागेल : नितीन पाटील

नितीन पाटील म्हणाले, पंढरीच्या विठ्ठलाकडे सर्व प्रकारची लोक जातात. यामध्ये काही पाकीटमार तर काही चोरही असतात. त्यातील कोणाचे ऐकायचे हे विठ्ठलाला माहिती असते.

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर ८८ ची कारवाई करण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला विश्वास दिला आहे. कारखाना अडचणीत आणल्याप्रकरणी किसन वीरच्या अध्यक्षांसह संचालकांवर जबाबदारी फिक्स करून त्यांची मालमत्तेवर टाच आणणे गरजेचे आहे. सहकार मंत्र्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन कारवाई केली नाही तर आम्हाला भाजप नेते किरीट सोमय्यांकडे जावे लागेल, असे खळबळ जनक विधान राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी केले आहे.

किसन वीर आबांनी उभी केलेली ही संस्था असून सहा तालुक्यातील शेतकरी कार्यकर्त्यांच्या घामातून ती उभी राहिली आहे. ही संस्था वाचली पाहिजे, असे सांगून नितीन पाटील म्हणाले, किसन वीर कारखाना दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर उभा आहे. गेल्यावर्षी एकाही बँकेने कारखान्याला कर्ज दिलेले नाही. उलट महाविकास आघाडी सरकारने ३० कोटी ५८ लाखांची थकहमी कारखान्याला दिली. त्यातून कारखान्याने गळीत केले.

गेल्यावर्षी केवळ चार लाख १६ हजार टन ऊसाचे गाळप झाले. त्यातून तीन लाख ७८ हजार पोती साखर निर्मिती होऊन कारखान्याला साखरेवर कोणीही कर्ज दिलेले नाही. यावर्षी या कारखान्याला थकहमी मिळाली नही तर १४ लाख टन ऊस उभा राहणार आहे, त्याला मदन भोसले व त्यांचे संचालक मंडळ जबाबदार असेल.

खासदार शरद पवारांच्या सांगण्यावरूनच आपण प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतल्याचे मदन भोसले यांनी सांगितले होते. त्याविषयी विचारले असता नितीन पाटील म्हणाले, पंढरीच्या विठ्ठलाकडे सर्व प्रकारची लोक जातात. यामध्ये काही पाकीटमार तर काही चोरही असतात. त्यातील कोणाचे ऐकायचे हे विठ्ठलाला माहिती असते.

किसन वीर कारखान्यात झालेल्या घोटाळ्याबाबत आम्ही सहकार मंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार ८८ अन्वये कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांची चौकशी करून जबाबदारी फिक्स करावी. तसेच संचालकांच्या मालमत्तांवर जप्ती आणावी, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी आमच्या मागणीची नोंद घेतली नाहीतर आम्हाला भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडे जावे लागेल, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT