Maharashtra Political News : पक्ष फोडाफोडीमुळे राज्यातील राजकीय स्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. ज्यांच्याविरोधात आक्रमकपणे लढले तेच आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. याचा परिणाम मात्र भाजपच्या जुन्या निष्ठावानांवर झाला आहे. नव्यानेच सोबत आलेल्या विरोधकांना मानाचे पान मिळत असताना आपल्याच कार्यकर्त्यांना मात्र भाजपने बेदखल केल्याचाच आरोप मोहोळमधील संजय क्षीरसागर यांनी केला आहे. यातूनच बाहेर पडत संजय क्षीरसागर यांनी यशवंत सेनेकडून लोकसभेत नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. BJP ignore own leader like Nagnath Khirsagar and Sanjay Kshirsagar from Mohol.
याबाबत संजय क्षीरसागर Sanjay Khirsagar म्हणाले, मोहोळ तालुका हा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असे असतानाही येथील मोठ्या ताकदीविरोधात कायम भिडलो आहे. तालुक्यात भाजपची बांधणी करून पक्ष वाढवण्याचे काम आम्ही केलेले आहे. आता भाजपला चांगले दिवस आले असताना ज्यांच्या विरोधात चिवटपणे लढलो त्यांना मानाचे पान मिळाले. यातून भाजपने आम्हाला बेदखल केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेतृत्वाने आमच्या प्रामाणिक कामावर अन्याय केला आहे. त्यामुळे आता यशवंत सेनेकडून सोलापूर लोकसभेची जागा लढवणार आहे, असेही संजय क्षीरसागरांनी स्पष्ट केले.
मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील Rajan Patil यांची मोठी ताकद आहे. त्या ताकदीविरोधात नागनाथ क्षीरसागर आणि संजय क्षीरसागर या बंधूंनी कायम कडवी झुंज दिलेली आहे. त्यासाठी त्यांनी कधी शिवसेना तर कधी भाजपची साथ घेतली. लढवलेल्या निवडणुकांत त्यांनी कायम दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली आहे. सध्या मात्र बदललेल्या राजकीय घडामोडीत क्षीरसागर बंधूंकडे भाजप नेतृत्वाचे दुर्लक्ष झाले आहे.
भाजपसोबत आल्यानंतर तालुक्यात अजित पवार Ajit Pawar गटातील नेत्यांचे प्रस्थ कायम राहिले आहे. युतीत सहभागी होऊनही त्यांनी विरोधक म्हणून राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर लोटण्याचे काम केल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. याकडे भाजपसह शिवसेना नेतृत्वाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. संजय क्षीरसागर यांना यशवंत सेनेकडून सोलापूर Solapur लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, इतर बंडखोरांची नाराजी दूर करणाऱ्या भाजपने मात्र क्षीरसागर बंधूच्या निर्णयावर चकार शब्दही काढला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशी आहे क्षीरसागर बंधूंची ताकद
मोहोळ Mohol विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये राखीव झाला. तेव्हापासून झालेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये क्षीरसागर यांनी तत्कालीन राष्ट्रवादीला तगडे आव्हान दिलेले आहे. 2009 च्या विधानसभेत नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष लढत दुसऱ्या क्रमांकाची 52 हजार 452 मते घेतली. 2014 मध्ये भाजपकडून संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे रमेश कदम यांना जेरीस आणले. त्यांनी 53 हजार 753 मते घेतली होती. त्यावेळी ते फक्त आठ हजार 367 मतांनी पराभूत झाले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले. त्यात त्यांनी 68 हजार 833 मते मिळवली होती.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.